Join us

ब्रेबॉर्न स्टेडियमही क्वारंटाईनसाठी वापरा; संजय राऊत यांच्या ट्विटला आदित्य ठाकरेंनी दिलं 'असं' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 3:04 PM

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत आणखी लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे.

मुंबई: राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत आणखी लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये बीकेसी, वरळी एनएससीआय येथे व्यवस्था पूर्ण झाली असून नजीकच्या काळात गोरेगाव, मुलुंड, दहीसर, वरळी दुग्ध वसाहत येथेही लवकरच अशा प्रकारे कोरोना केअर सेंटर्स उभारली जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांची वानखेडे स्टेडियम इथे व्यवस्था करता येईल का याची पाहणी महापौर यांनी केली होती. वानखेडेसारखे मोठे मैदान क्वारंन्टाईनसाठी वापरण्याच्या हालचाली सुरू झाल्या असताना ब्रेबॉर्न मैदानही वापरण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत ट्विट करत म्हणाले की,  कोरोनाच्या रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी वानखेडे मैदानाचा वापर केला जाऊ शकतो. तसेच वानखेडेप्रमाणे ब्रेबॉर्न मैदानचा उपयोग देखील क्वारंटाईन रुग्णांना ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो, असा पर्याय संजय राऊत यांनी सुचवला होता. मात्र यावर पावसाळा तोंडावर असताना असे मैदान वापरणे योग्य ठरणार नाही असं मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सांगितले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, पावासाळ्यात खेळाचे मैदान वापरणे शक्य नाही. कारण पावसाच्या पाण्यामुळे तिथे चिखल होऊ शकतो. फक्त गरज पडल्यास या स्टेडियममधील पार्किंग आणि खोल्या वापरता येईल का याचा निरामय वेळेनुसार महापालिका घेईल, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेला लॉकडाऊन राज्य सरकारनं ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुख्य सचिवांनी याबद्दलचे आदेश काढले आहेत. लॉकडाऊन लागू असूनही राज्यातील रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. मात्र तिसरा लॉकडाऊन संपत असताना राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३० हजारांच्या पुढे गेला. राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्या १८ हजारांहून जास्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

CoronaVirus News: राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला; ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

'लाव रे तो व्हिडीओ 2.0'?; मनसे नेत्याने ट्विट केलं मोदींचं 'ते' भाषण

...तर तुझी अवस्था साखर कारखान्यासारखी होईल; निलेश राणेंचा रोहित पवारांवर पलटवार

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसआदित्य ठाकरेसंजय राऊतशिवसेनामहाराष्ट्रमुंबई