माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पाचोरा येथे सभा सुरू आहे. या सभेत बोलताना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला. कोरोना काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या ऐवजी पीएम केअर फंडात पैसे भरा, असे देवेंद्र फडणवीस म्हणत होते. तेव्हा फडणवीस यांना राजकारण करु नका, असं का सांगितलं नाही, असा सवाल सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना केला.
गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावरुन राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टोला लगावला होता. " कोरोना काळातही हलगर्जीपणा झाला आहे. त्यामुळे त्याठिकाणी आजही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो, असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टोला लगावला होता. या टीकेला आज सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले.
सुषमा अंधारे म्हणाल्या, गेली दोन वर्षी कोरोना काळ सुरू असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीऐवजी पीएम केअर फंडात पैसे भरा, असे त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. तेव्हा तुम्ही फडणवीस यांना राजकारण करु नका, असं का सांगितले नाही, असा सवाल अंधारे यांनी राज ठाकरे यांना केला.
"जेव्हा भाजप काही लोकांना पुढे करुन राज्यातील मंदीरे खुले करण्यासाठी आंदोलन करत होते. त्यावेळी सगळी प्रार्थनास्थळ बंद होती. पण फक्त वारीच बंद आहे, असं चित्र दाखवून राज्यात अस्थिरता निर्माण करणाऱ्या भाजप नेत्यांना राजकारण करु नका, असे राज ठाकरे का म्हणाले नाहीत.
कोरोना काळात उत्तर प्रदेशात रस्त्यावर कोरोना ग्रस्तांनी प्रेत रस्त्यांवर जाळली जात होती. तेव्हा हलगर्जीपणा नव्हता का? त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक आंतरराष्ट्रीय स्तरावर झाले होते .