Join us

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या तब्बल ४१ मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 6:12 AM

प्राप्तिकर विभागाने स्थायी समितीचे अध्यक्ष, शिवसेना नेते यशवंत जाधव  आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वांद्रे येथील ५ कोटी किंमतीच्या फ्लॅट्सह ४१ मालमत्ता जप्त केल्या आहेत. तसेच त्यांच्या अन्य मालमत्तांचा शोध सुरू असल्याचे प्राप्तिकर विभागाने सांगितले. 

मुंबई : प्राप्तिकर विभागाने स्थायी समितीचे अध्यक्ष, शिवसेना नेते यशवंत जाधव  आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वांद्रे येथील ५ कोटी किंमतीच्या फ्लॅट्सह ४१ मालमत्ता जप्त केल्या आहेत. तसेच त्यांच्या अन्य मालमत्तांचा शोध सुरू असल्याचे प्राप्तिकर विभागाने सांगितले. 

‘प्राप्तिकर’च्या आतापर्यंतच्या कारवाईतून ४१ मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या चौकशीत जाधव परिवाराने प्रधान कंपनीला कर्जाची परतफेड म्हणून दिलेले पैसे हे विविध मार्गांनी फिरवून कंत्राटदार बिमल अगरवालच्या कंपनीत आल्याचीही माहिती समोर येत आहे. २८ जप्त  मालमत्ता न्यूशॉक मल्टिमीडिया नावाने नोंद आहेत. पुतण्या विनीत जाधवमार्फत त्यांचा या मालमत्तांवर नियंत्रण असल्याचा प्राप्तिकर विभागाला संशय आहे. 

दुसरीकडे,  यातील पैशांमधून यशवंत जाधव यांनी आपल्या सासू सुनंदा मोहिते यांच्या नावावर भायखळा परिसरात इंपेरिकल क्राऊन नावाचे हॉटेलही खरेदी केल्याचेही समोर आले आहे. तसेच, यशवंत जाधव यांचा मेव्हणा आणि पुतण्याला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी  समन्स बजावले होते. मात्र ते हजर राहिलेले नाही. 

टॅग्स :यशवंत जाधवमुंबई महानगरपालिकाशिवसेना