चर्चा तर होणारचं! शिवसेना मंत्र्यांनी भेट घेतली अन् शरद पवारांनी 'उज्ज्वल' कार्यक्रम उरकला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 12:17 PM2021-07-14T12:17:53+5:302021-07-14T12:19:26+5:30
महादू हावजी बच्चे यांनी १८९० साली मुंबईत काम करणाऱ्या सामान्यवर्गासाठी जेवणाचे डबे पोहचवण्याचा उपक्रम कुलाबा येथे सुरू केला. होता. आजमितीस सुमारे दोन लक्ष नोकरदार, कामगार, मुले यांना डबा पोहचवण्याचे कार्य ही संघटना करत आहे.
मुंबई - मुंबईच्या डबेवाल्यांची संघटना जिच्या व्यवस्थापन कौशल्याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली आहे. इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनीही भारतात येऊन ज्यांचे कौतुक केले, त्या संघटनेच्या डबेवाल्यांकरिता मोफत सायकल वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. त्यासाठी, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्जल निकम यांनी पुढाकार घेतल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे, दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांनी भेट घेतल्यानंतर आज शरद पवारांनी उज्ज्वल कार्यक्रम उरकल्याचं दिसून येत आहे.
महादू हावजी बच्चे यांनी १८९० साली मुंबईत काम करणाऱ्या सामान्यवर्गासाठी जेवणाचे डबे पोहचवण्याचा उपक्रम कुलाबा येथे सुरू केला. होता. आजमितीस सुमारे दोन लक्ष नोकरदार, कामगार, मुले यांना डबा पोहचवण्याचे कार्य ही संघटना करत आहे. वक्तशीरपणा, सातत्य, समन्वय आणि सेवाभाव ह्या गुणांचा मिलाप असणाऱ्या संघटनेकडून खूप काही शिकायला मिळते, असे शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच, शतकाहून अधिक काळाच्या अनुभवाची शिदोरी पाठीशी असलेल्या संघटनेची बदलत्या काळातही वृद्धी आणि समृद्धी होत राहो, अशा शुभेच्छाही शरद पवार यांनी संघटनेला दिल्या आहेत. दरम्यान, उज्ज्वल निकम यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम संपन्न झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा तर होणारच.
कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्या पुढाकाराने व संघटनेचे प्रमुख उल्हास मुके यांच्या विद्यमाने माझ्या निवासस्थानी हा हृद्य कार्यक्रम झाला.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 14, 2021
महादू हावजी बच्चे यांनी १८९० साली मुंबईत काम करणाऱ्या सामान्यवर्गासाठी जेवणाचे डबे पोहचवण्याचा उपक्रम कुलाबा येथे सुरू केला. pic.twitter.com/C8dC4tg053
एकनाथ शिंदेंनी घेतली होती भेट
राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपल्या पक्षात यावे, यासाठी शिवसेनेकडून त्यांना गळ घालण्यात आली असून, जळगाव दौऱ्यावर आलेले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ॲड. निकम यांची घरी जाऊन भेट घेतली होती. विशेष म्हणजे या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. सरकारी दौऱ्यातही त्याचा उल्लेख नव्हता. गेल्या महिन्यात खा. संजय राऊत यांनीही ॲड. निकम यांची भेट घेतली होती. मात्र, शरद पवार यांच्यासोबत थेट कार्यक्रमात सहभागी झाल्याने आता वेगळीच चर्चा रंगणार आहे.