मुंबई: मनुष्याचे भूतलावरील कार्य संपन्न झाल्यावर त्याचा प्रवास थांबतो आणी सुरू होते ती अंतिम यात्रा जवळच्याच स्मशानभूमीत. अंधेरी (पूर्व ) पारसी वाडा येथील स्मशानभूमी ओळखली जाते ते तेथील विनम्र स्वभावाच्या कर्मचारी वर्गामुळे. येथे आलेल्या मृतांवर वर्षाचे 365 दिवस 24 तास अंत्यसंस्कारासाठी सदैव तत्पर असणार्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या उदात्त हेतूने माणुसकीच्या नात्यातून सालाबादप्रमाणे शिवसेना उबाठा विलेपार्ले विधानसभेने त्यांना फराळ,मिठाई,भेटवस्तू देऊन त्यांच्या बरोबर दिवाळी सण साजरा करत त्यांची दिवाळी गोड केली.
माजी मंत्री व शिवसेना नेते अँड.अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विलेपार्ले स्मशानभूमी विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डीचोलकर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अंधेरी स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली.त्यांना भेटवस्तू,मिठाई व फराळाच्या वस्तू भेट देऊन कर्मचाऱ्यांबरोबर आम्ही दिवाळी साजरी केली. येथील सर्व कर्मचारी वर्गाच्या चेहर्यावरचा आनंद पाहून आमची दिवाळी सुद्धा गोड झाली अशी माहिती डीचोलकर यांनी दिली.
तर आमच्या कार्याची दखल घेत आम्हाला भेटवस्तू,फराळ देत आमचे तोंड गोड केल्या बद्दल येथील स्मशानातील कर्मचाऱ्यांनी शिवसेनेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.