अब्दुल सत्तार यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेला पहिला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 10:57 AM2020-01-04T10:57:27+5:302020-01-04T11:12:42+5:30

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप होण्यापूर्वीच शिवसेनेला जबरदस्त धक्का बसला आहे.

Shiv sena MLA Abdul Sattar resigns from ministry | अब्दुल सत्तार यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेला पहिला धक्का

अब्दुल सत्तार यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेला पहिला धक्का

googlenewsNext

मुंबई -  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटकपक्षामधील अनेक नेत्यांची नाराजी समोर आली होती. दरम्यान, मंत्रिमंडळात स्थान मिळूनही केवळ राज्यमंत्रिपद मिळाल्याने शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांची समजूत काढण्यासाठी शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे दाखल झाले आहेत. 

अब्दुल सत्तार हे आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून शिवसेनेत आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर सिल्लोड मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल अशी सत्तार यांना अपेक्षा होती. त्यानुसार शिवसेनेने सत्तार यांना राज्यमंत्रिपद दिले. तर औरंगाबादमधून पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. मात्र कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने सत्तार नाराज झाले. अखेर आज त्यांनी खातेवाटप जाहीर होण्यापूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला.  

दरम्यान,  सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर जवाबदारी देण्यात आली असून, खोतकर यांनी शुक्रवारी मध्यरात्री औरंगाबादेत अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये रात्री दीड वाजेपर्यंत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर याचवेळी खोतकर यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे सत्तार यांच्यासोबत फोनवरून बोलणं करून दिले असल्याची ही बोलले जात आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Read in English

Web Title: Shiv sena MLA Abdul Sattar resigns from ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.