Join us

दहाव्या सूचीत काही संज्ञांचा योग्य अर्थ लावलाय; निकालाआधी राहुल नार्वेकरांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 10:55 AM

राज्याच्या राजकारणात सत्तासंघर्षातील आमदार अपात्रतेचा खरा निकाल आज बुधवारी लागणार आहे.

Shiv Sena ( Marathi News ) : मुंबई- राज्याच्या राजकारणात सत्तासंघर्षातील आमदार अपात्रतेचा खरा निकाल आज बुधवारी लागणार आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांनाच निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे सांगत, त्यांच्याकडे हे प्रकरण सोपवले. गेल्या ५ महिन्यांपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संबंधित प्रकरणातील दोन्ही बाजुंवरील सुनावणी घेतली. आता अखेर आज याबाबत निर्णय येणार आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 

विधानसभा अध्यक्षांच्या निकालात कोण अपात्र?; शिंदे-ठाकरेंच्या या ३० आमदारांचीही धाकधूक वाढली

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज दिला जाईल. कायद्याला धरून हा निकाल असेल. कायद्याच्या सर्व तरतुदींचे पालन करून हा निकाल दिला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने जी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत, त्याला अनुसरूनच हा निकाल असेल, असंही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. 

"आजच्या निकालात सर्वांना न्याय मिळेल. तसेच भारतीय संविधानाच्या शेड्युल १० मध्ये काही संज्ञा अशा होत्या, ज्याचे योग्य पद्धतीने अर्थ लावण्यात आला नव्हता किंवा व्याख्या करण्यात आल्या नव्हत्या. ते या प्रकरणात करणे गरजेचे होते. त्या सर्वांचा विचार या निकालात करण्यात आला आहे. त्यामुळे शेड्युल १० च्या दृष्टीने बेंचमार्क ठरेल, असा हा निकाल असेल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. 

उद्धव ठाकरेंच्या गटातील कोणत्या १४ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?

  - अजय चौधरी  - भास्कर जाधव  - रमेश कोरगावंकर  -  प्रकाश फातर्फेकर   - कैलास पाटील  - संजय पोतनीस  - रवींद्र वायकर  - राजन साळवी  - वैभव नाईक  -  नितीन देशमुख  - सुनिल राऊत  - सुनिल प्रभू  - उदयसिंह राजपूत  - राहुल पाटील

शिवसेना शिंदे गटातील कोणत्या १६ आमदारांचा समावेश?

 - एकनाथ शिंदे - भरत गोगावले - संजय शिरसाठ  - लता सोनवणे - प्रकाश सुर्वे - बालाजी किणीकर - बालाजी कल्याणकर - अनिल बाबर  - चिमणराव पाटील - अब्दुल सत्तार - तानाजी सावंत - यामिनी जाधव  - संदीपान भुमरे - संजय रायमूळकर - रमेश बोरनारे - महेश शिंदे

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदेउद्धव ठाकरे