Join us

शिवसेना आमदारांना पोलीस संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2019 6:30 AM

विधानसभा निवडणुकीत जिंकून आलेल्या सेनेच्या आमदारांना मालाडच्या मढ येथील रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

मुंबई : सत्ता स्थापनेवरून फोडाफोडीचे राजकारण सुरू असताना शुक्रवारी शिवसेनेच्या आमदारांना पोलीस संरक्षण देण्यासाठी सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्याकडे अर्जाद्वारे मागणी केली आहे. त्यानुसार स्थानिक पोलिसांकडून बंदोबस्त पुरविण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीत जिंकून आलेल्या सेनेच्या आमदारांना मालाडच्या मढ येथील रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. फोडाफोडीच्या राजकारणामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत आमदारांची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या आमदारांना १५ तारखेपर्यंत पोलीस संरक्षण मिळावे, यासंदर्भातील पत्र नार्वेकर यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे. पत्र मिळाल्याच्या वृत्ताला पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दुजोरा दिला असून, स्थानिक पोलिसांकडून बंदोबस्त पुरविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :शिवसेनामुंबईआमदार