Join us

एसीबीच्या नोटीसीनंतर शिंदे गटात प्रवेश करणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 12:47 PM

शिवसेनेत मोठे बंड झाल्यापासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

शिवसेनेत मोठे बंड झाल्यापासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आमदार राजन साळवी शिंदे गटात प्रवेश करणार अशा चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमिवर साळवी यांना एसीबीची चौकशीसाठी नोटीस आली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा राजन साळवी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर आता आमदार राजन साळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

 'काल एसीबीची नोटीस आली आहे, यात त्यांना मालमत्तेची माहिती देण्यासाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मी चौकशीसाठी उपस्थित राहणार आहे. माझी निष्ठा बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणाशी आहेत, कितीही माझ्यावर दबाव आला तरीही मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोडणार नाही. अशा नोटीसा कितीही आल्या तरही मी पक्ष सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार राजन साळवी यांनी दिली. 

'छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला'; प्रसाद लाड यांचे वक्तव्य, राष्ट्रवादीकडून व्हिडिओ ट्विट

' मी शिवसेनेमुळे आमदार झालो आहे, माझ्याबाबतीत अशा कितीही बातम्या आल्या तरीही मी शिवसेना सोडणार नाही. माझ्या मालमत्ते संबंधीत नोटीस आली आहे, अशा नोटीसांना मी घाबरत नाही. भविष्यात त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला तरीही काही फरक पडणार नाही, माझी निष्ठा कायम बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणाशी असणार आहे, असंही आमदार राजन साळवी म्हणाले. 

या प्रकरणी मला जेलमध्ये टाकले तरीही मी शिंदे गटात प्रवेश करणार नाही. मी मरेपर्यंत निष्ठावंत शिवसैनिक राहणार आहे, हिंमत असेलतर मला जेल मध्ये टाकून दाखवा, असंही राजन साळवी म्हणाले. 

टॅग्स :राजन साळवीशिवसेनाउद्धव ठाकरे