Join us  

खोटं बोलून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय; राहुल शेवाळेंच्या गौप्यस्फोटानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 7:48 PM

बंडखोर खासदार राहुल शेवाळेंच्या आरोपानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई- शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपा आणि शिवसेना युतीसंदर्भात आज दिल्लीतील पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: भाजपासोबत युतीसाठी आग्रही होते. पण, खासदार संजय राऊत यांनी खोडा घातला असा घणाघाती आरोप राहुल शेवाळे यांनी केला. 

विशेष म्हणजे युतीसाठी उद्धव ठाकरे जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले होते. त्यावेळी त्यांनी तासभर चर्चाही केली होती. मात्र, पुढच्या जुलै महिन्यात भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं. त्यामुळे, ही बोलणी पुढे सरकलीच नाही, असा गौप्यस्फोटही राहुल शेवाळे यांनी यावेळी केला. 

राहुल शेवाळेंच्या या आरोपानंतर आता खासदार अरविंद सावतं यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळावा अशी उद्धव ठाकरे यांची पहिल्यासून भूमिका होती. खोटं बोलून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. ईडीच्या भीतीने हे भाजपसोबत गेले आहेत हे जनतेला माहिती आहे. ज्यांनी गेल्या अडीच वर्षांपासून उद्धव ठाकरे यांना सतावलं. आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली. 

दरम्यान, शिवसेना भाजपा युती व्हावी यासाठी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक तास चर्चा झाल्याचं खासदार राहुल शेवाळे सांगितलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, त्यावेळी ही चर्चा झाल्याचं स्वत: उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचं राहुल शेवाळे म्हणाले.

एनडीएमधून आम्ही बाहेर पडलो नाही-

आम्ही भाजपसोबत युती मोडली, पण एनडीएमधून बाहेर पडलो नाही. आम्ही तसं पत्र दिलं नाही. आम्ही आजही एनडीएचा घटक आहोत. अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला, पण आम्ही एनडीएमधून बाहेर पडल्याचं पत्र दिलं नव्हतं. तसेच आम्ही यूपीएमध्ये आहोत असंही पत्र दिलं नाही, असं राहुल शेवाळे यावेळी म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरेराहुल शेवाळेअरविंद सावंतशिवसेनाभाजपा