Jogeshwari Vidhan Sabha Election Results 2024 : जोगेश्वरीत रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर आघाडीवर, सुरुवातीच्या कलात महायुतीची जोरदार मुसंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 10:23 AM2024-11-23T10:23:31+5:302024-11-23T10:24:10+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Result Jogeshwari Vidhansabha : आता ईव्हीएम मतांची मोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये या ठिकाणी शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर या आघाडीवर असल्याचं दिसून आलंय.
Maharashtra Assembly Election 2024 Result Jogeshwari Vidhansabha : जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली आहे. सर्वप्रथम पोस्टल बॅलेटची मोजणी पार पडली. त्यानंतर आता ईव्हीएम मतांची मोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये या ठिकाणी शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर या आघाडीवर असल्याचं दिसून आलंय. सुरुवातीला त्या ३ हजार मतांनी आघाडीवर आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती २०६ जागांवर, तर मविआ ७५ आणि इतर ८ जागांवर आघाडीवर असल्याचं दिसून येतंय.
अविभाजित शिवसेनेसाठी ही जागा महत्त्वाची राहिली आहे. या ठिकाणी रवींद्र वायकर पत्नी मनीषा वायकर या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अनंत बी. नर हे शिवसेना उबाठाकडून तर भालचंद्र अंबुर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे यंदा ही जागा कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
Maharashtra Assembly Election Results
जोगेश्वरीपूर्व विधानसभा मतदारसंघ २००८ नंतर अस्तित्वात आला. २००९, २०१४, २०१९ पर्यंतच्या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र वायकर सलग विजयी झाले. मात्र, यावेळी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना उबाठाकडून वेगळा उमेदवार उभा राहिल्यानं ही लढत रंजक बनली आहे. जोगेश्वरी मतदारसंघात एकूण २ लाख ८४ हजार ४४३ मतदार आहेत. या मतदारसंघात अनुसूचित जाती-जमातीच्या मतदारांची संख्या सुमारे चार टक्के आहे. याशिवाय या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या १४ टक्क्यांहून अधिक आहे.