'नाकासमोरुन पळवून नेलेले उद्योग परत आणा'; एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावरुन राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 10:50 AM2023-01-16T10:50:03+5:302023-01-16T10:54:23+5:30

दावोसला जगभरातून लोक येत असतात. आतापर्यंत दावोसला जाऊन किती उद्योग आणले हे सर्वांना माहित आहे. अनेक प्रकल्प महाराष्ट्रात आणलेले गुजरातला गेले आहेत.

Shiv Sena MP Sanjay Raut criticized Chief Minister Eknath Shinde's visit to Davos | 'नाकासमोरुन पळवून नेलेले उद्योग परत आणा'; एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावरुन राऊतांचा हल्लाबोल

'नाकासमोरुन पळवून नेलेले उद्योग परत आणा'; एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावरुन राऊतांचा हल्लाबोल

googlenewsNext

मुंबई- दावोसला जगभरातून लोक येत असतात. आतापर्यंत दावोसला जाऊन किती उद्योग आणले हे सर्वांना माहित आहे. अनेक प्रकल्प महाराष्ट्रात आणलेले गुजरातला गेले आहेत. ते प्रकल्प अगोदर परत आणा मग दाओसला जावा, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. 

मुंबईती आणलेले बरेच प्रकल्प हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणलेले प्रकल्प आहेत. दावोसला जाण्यापेक्षा तुम्ही गुजरातला जावा, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. 

नरेंद्र मोदी यांचा दौरा, चहल यांना ईडीचे निमंत्रण

या सर्व प्रकल्पांच्या योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळात केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिष्ठेला डाग लावण्याचे काम सुरू आहे, असंही संजय राऊत म्हणाले. या सरकारच्या काळात बदनामीच्या मोहीमा राबविल्या जात आहेत. उत्तर प्रदेशमधील नद्यांमधून कोरोना काळात प्रेत वाहत होतीत, तशी महाराष्ट्रात परिस्थिती नव्हती, कोविड काळात गुजरातमधील रुग्णालयात जागा नव्हती, असंही संजय राऊत म्हणाले. 

केंद्र सरकारने सर्व यंत्रणा ताब्यात घेतल्या आहेत. न्यायव्यवस्थेवर घाला घालण्याचे काम केंद्र सरकार करत आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी लगावला.  

दरम्यान, दावोस दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत कार्यक्रमांसाठी येणार आहेत, त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यासाठी जाणार नाहीत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसचा दौरा लवकर आवरुन राज्यात परतमार आहेत, यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गुंतवणउकीबद्दल सरकार गंभीर नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला. 

सरकार गुंतवणुकीबाबत गंभीर नाही

'पंतप्रधान काही तासांसाठी मुंबईत येणार आहेत. पंतप्रधानाच्या दौऱ्याची तारीख विनंती करून बदलता आली असती. मात्र शिवसेनेचा पराभव करणे आणि मुंबई महापालिका निवडणुका हेच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचे लक्ष्य आहे, असंही संजय राऊत म्हणाले. पंतप्रधानांना विनंती केली असती तर त्यांनी तारीख पुढे ढकलली असती. देशातील सर्व राज्याचे प्रतिनिधी दावोसला चालले आहेत आणि आमचे सरकार दौरा रद्द करत आहे त्यामुळे महाराष्ट्राचं सरकार गुंतवणुकीबाबत गंभीर नाही असं त्यांनी म्हटलं. 
 

Web Title: Shiv Sena MP Sanjay Raut criticized Chief Minister Eknath Shinde's visit to Davos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.