Shiv Sena National Executive Meeting: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने दिल्यानंतर आता शिंदे गटाने कंबर कसली आहे. राज्यातील विधिमंडळ आणि संसदेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर आता शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये अनेक महत्त्वाचे ठराव करण्यात आले. याविषयी मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांना माहिती दिली.
या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकमताने पक्षाचा प्रमुख नेता म्हणून जाहीर करण्यात आले. या बैठकीत ठराव संमत करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असा ठराव शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी मांडला. शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या मागणीचा पाठपुरावा केंद्राकडे केला जाईल, असेही या बैठकीत ठरल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. मूळ शिवसेनेचा ताबा एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्यानंतर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची पहिली बैठक ताज प्रेसिडन्सिमध्ये पार पडली.
राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत नेमके कोणते ठराव संमत करण्यात आले?
- वीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा ठराव
- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात ठराव
- वीरमाता जिजाऊ, आहिल्याबाई होळकर, छत्रपती संभाजी महाराज यांना राष्ट्रपुरुषांच्या यादीत स्थान देण्याचा ठराव
- स्पर्धा परीक्षांसाठी गावागावात प्रशिक्षण वर्ग स्थापन करणार
- भूमिपूत्रांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के प्राधान्य
- संघटनात्मक वाटचालीसाठी निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करणार
- शिवसेना यापुढे युती करताना बाळासाहेबांनी आखून दिलेल्या विचारांवर कायम राहील
- उद्धव ठाकरे यांनी केलेल्या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही गड-किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी प्रयत्न करणार
- पक्षात शिस्त रहावी यासाठी, शिस्तभंग समितीची स्थापना
- समितीच्या अध्यक्षपदी मंत्री दादा भुसे, सदस्यपदी शंभूराज देसाई आणि संजय मोरे यांची निवड
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"