शिवसेना-राष्ट्रवादीने केले प्रियंकाचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 04:29 AM2019-01-25T04:29:17+5:302019-01-25T04:29:31+5:30

प्रियंका गांधी यांना समाजकारणाचा मोठा अनुभव असून त्यांनी संघटनात्मक जबाबदारी स्वीकारली ही चांगली गोष्ट आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले.

Shiv Sena-NCP's welcome to Priyanka | शिवसेना-राष्ट्रवादीने केले प्रियंकाचे स्वागत

शिवसेना-राष्ट्रवादीने केले प्रियंकाचे स्वागत

googlenewsNext

मुंबई : प्रियंका गांधी यांना समाजकारणाचा मोठा अनुभव असून त्यांनी संघटनात्मक जबाबदारी स्वीकारली ही चांगली गोष्ट आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले. तर, प्रियंका यांना राजकारणात उतरवण्याचा काँग्रेसचा निर्णय अचूक आणि योग्य वेळी घेतला गेल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राऊत म्हणाले, प्रियंका यांच्या राजकीय प्रवेशामुळे उत्तर प्रदेशसह हिंदी पट्ट्यात निश्चित हलचल निर्माण झाली आहे. आदिवासी भागातही त्यांना प्रतिसाद मिळेल. आजही आदिवासी इंदिरा गांधी यांचेच नाव घेतात. प्रियंकांच्या राजकारण प्रवेशाने नक्कीच काँग्रेसला फायदा होईल. यूपीत २१ ते २२ जागांवर काँग्रेसचा प्रभाव आहे, तिथे फायदा होईल. देशात अशी काही घराणी आहेत, ज्यांच्यावर लोकांचे प्रचंड प्रेम आहे. मग तुम्ही या घराण्यांवर कितीही टीका करा. शिवाय, प्रियंका गांधी यांनी राजकारणात यावे अशी काँग्रेसमध्येच भावना होती, असे राऊत म्हणाले.
>प्रत्यक्ष जबाबदारी स्वीकारली ही चांगली बाब
खा. सुप्रिया सुळे यांनी प्रियंकाचे स्वागत केले. त्या म्हणाल्या, भारतीय राजकारणात गांधी कुटुंबाचे मोठे योगदान आहे. स्वत: प्रियंका यांनी आजवर पडद्यामागे राहून आपली आई आणि भावाच्या मतदारसंघासाठी काम केले आहे. आता त्यांनी समोर येत प्रत्यक्ष संघटनात्मक जबाबदारी स्वीकारली ही चांगली बाब आहे. एखादी महिला सार्वजनिक क्षेत्रात समोर येणार असेल तर ते चांगलेच आहे.

Web Title: Shiv Sena-NCP's welcome to Priyanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.