Join us  

विरोधी पक्षनेत्यांवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेला गृहखातं हवं; भाजपा नेत्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 6:14 PM

हे कसलं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. विकास सोडून फक्त द्वेषाच राजकारण सुरू झालंय असा आरोप भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केला.

मुंबई – राज्यात गृहमंत्रालयाच्या कारभारावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर गृहखातं शिवसेनेने घ्यावं अशी मागणी जोर धरू लागली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्र्यांवर नाराज असल्याची बातमी आली. त्यानंतर तातडीने मुख्यमंत्री कार्यालयाकडून या बातमीचं खंडण करण्यात आले. परंतु आता या मुद्द्यावरून भाजपा नेत्यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्यास सुरूवात केली आहे.

भाजपा नेते मोहित कंबोज म्हणाले की, महाराष्ट्रातली राजकारण खालच्या पातळीवर गेलं आहे. विकासकाम किंवा भ्रष्टाचाराच्या मुद्दावर कारवाई होताना आम्ही याआधी पाहिल आहे पण विरोधी पक्षाच्या नेत्यांवर काही कारवाई होत नाही म्हणून गृहखातं बदलाव अशी मागणी होताना पहिल्यांदाच पाहतोय. महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडताना पाहतोय. आजपर्यंत नवाब मलिकांवर कारवाई नाही. मलिक यांच मंत्रीपद मुख्यमंत्र्यांनी काढल नाही. पण भाजपावर कारवाई होत नाही म्हणून शिवसेना गृहखातं मागत आहेत असा आरोप त्यांनी केला.

तसेच हे कसलं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे.  विकास सोडून फक्त द्वेषाच राजकारण सुरू झालंय. सगळे मुद्दे सोडून फक्त द्वेषाच राजकारण करण्याच एकमेव काम ठाकरे सरकारकडे उरलं आहे. हे अतिशय घाणेरडं राजकारण सुरू आहे. महाराष्ट्रातील राजकारण देशामधील जनता बघत आहे. इथे विकासाची चर्चा संपलेली आहे आणि सूडबुद्धीची कारवाई सुचलेली आहे. महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेचा विकास हा खुंटलेला आहे. नुसतं विरोधकांवर कारवाई करण्यासाठी हे सरकार अति उत्सुक आहे असं दिसून येत आहे. कारण विरोधक या सत्ताधार्‍यांचे अनेक भ्रष्टाचार उघड करत आहेत आणि आमच्यावर सूडबुद्धीने कारवाई व्हावी याकरता शिवसेनेला गृह खातं हवं आहे असंही मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.

संजय राऊतांचा भाजपाला टोला

महाविकास आघाडीत कुठेही विसंवाद नाही. कुठलाही संभ्रम निर्माण करू नका. मुख्यमंत्री प्रत्येक मंत्र्यांशी संवाद साधत असतात. राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद हवय असं भाजपा म्हणते. मग भाजपालाही मुख्यमंत्रिपद हवंय. ते पद कुणाला नको? भाजपाने उगाच त्रास करून घेऊ नये. मानसिक यातना झाल्यानंतर अशाप्रकारे झटके येत असतात. अडीच वर्ष तुम्हीही शांत बसा आणि आम्हालाही शांत बसूद्या. महाविकास आघाडीत ५ वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे राहील असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांनी भाजपाला लगावला.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेशिवसेनाभाजपा