ठाण्याचा 'बदला' कोकणात; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धरली मनसेची वाट
By मुकेश चव्हाण | Published: February 2, 2021 03:50 PM2021-02-02T15:50:37+5:302021-02-02T15:51:19+5:30
मनसेने शिवसेनेचा कल्याण- डोंबिवलीमधील बदला थेट कोकणात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई: आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. सोमवारी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आज पुन्हा मनसेला आणखी एक धक्का बसला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते आणि गटनेते मंदार हळबे यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यी उपस्थितीत मंदार हळबे यांनी भाजापत प्रवेश केला. मंदार हळबे यांनी भाजपात प्रवेश केल्यानं कल्याण- डोंबिवलीत मनसेला मोठं खिंडार पडल्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र याचदरम्यान मनसेने शिवसेनेचा कल्याण- डोंबिवलीमधील बदला थेट कोकणात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
खेड तालुक्यातील मेटे गावातील (पाटील वाडी) मधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शाखा अध्यक्ष सह शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश केला आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कामगार सेनेचे जिल्हा सरचिटणीस व खेड तालुका उपाध्यक्ष संदिप फडकले यांच्या माध्यमातून गाव मेटे ( पाटील वाडी) शिवसेनेचे शाखा अध्यक्ष रविंद्र शिगवण व त्यांचे कार्यकर्ते सचिन पंडे, बाबु बुरटे, विनय शिगवण, हरि बुरटे, संतोष पंडे, शांताराम भुवड, कृष्णा गावडे, मनोहर खोचरे, सखाराम धाडवे, प्रदिप गावडे, सुरेश खोचरे, विलास गावडे, संजय गावडे, रविंद्र खोचरे, दिनेश खोचरे, काशिराम गावडे, प्रसन्ना शिगवण, पांडुरंग गावडे, पांडुरंग बुरटे, शंकर खोचरे, संतोष गावडे, कृष्णा पंडे, सोनू खोचरे, जयंत शिगवण, भिकाजी पंडे,विनय खोचरे, शशिकांत शिगवण, संदिप कांदेकर, दिलीप खोचरे, शिवा खोचरे, शंकर खोचरे यांनी मनसेत जाहिर प्रवेश केला.
सदर वेळी उपस्थितीत मनसे खेड शहराध्यक्ष तथा गटनेते श्री भूषण चिखले, महिला सेनेच्या शहराध्यक्षा मा. नगराध्यक्ष सौ. उर्मिला पाटणे, शेट्ये, मा. महिला व बाल कल्याण सभापती व नगरसेविका सौ. मानसी चव्हाण, खेड तालुका उपाध्यक्ष संजय आखाडे,शहर उपाध्यक्ष गणेश बेलोसे, मनविसे जिल्हाअध्यक्ष पुष्पेंन दिवटे,मा. जिल्हा अध्यक्ष नंदू साळवी,ऋषिकेश कानडे, तालुका अध्यक्ष प्रसाद शेट्ये, उपतालुकाध्यक्ष आधार पाटणे, शहराध्यक्ष केतन आंब्रे,मा. उपशहर अध्यक्ष रोहन भोजन,विभाग अध्यक्ष रितेश डंबे, सागर कवळे, विशाल खेडेकर,विभाग अध्यक्ष हर्ष गांधी,संतोष पवार,मनोज दांडेकर, जयेश गुहागरकर,प्रदिप भोसले, व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.