Sanjay Raut On Devendra Fadnavis: “कायद्यापुढे सर्व समान, हा तमाशा का?”; देवेंद्र फडणवीस नोटिसीवरून संजय राऊतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 02:43 PM2022-03-13T14:43:18+5:302022-03-13T14:45:15+5:30

Sanjay Raut On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांची तब्बल दोन तास पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.

shiv sena sanjay raut and ncp chhagan bhujbal criticised bjp over devendra fadnavis notice issue | Sanjay Raut On Devendra Fadnavis: “कायद्यापुढे सर्व समान, हा तमाशा का?”; देवेंद्र फडणवीस नोटिसीवरून संजय राऊतांची टीका

Sanjay Raut On Devendra Fadnavis: “कायद्यापुढे सर्व समान, हा तमाशा का?”; देवेंद्र फडणवीस नोटिसीवरून संजय राऊतांची टीका

Next

मुंबई: भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना बीकेसी सायबर पोलिसांकडून नोटीस बजावत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्थानकात हजर राहून जबाब नोंदवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, त्यानंतर गृहमंत्रालयाने देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जबाब नोंदवण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांना बजावलेल्या नोटिसीविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून, राज्यभर आंदोलन निदर्शने करण्यात आली. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. कायद्यापुढे सगळे समान आहेत, मग हा तमाशा कशासाठी, अशी विचारणा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. 

संजय राऊत यांनी एक ट्विट केले असून, ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. कमाल आहे! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

पोलिसांनी साधी माहिती घ्यायची नाही का?

संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना भाजपवर टीका केली आहे. ईडी कुणालाही उचलून नेते, मग भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीचे भांडवल का करत आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस केवळ माहिती घेणार आहेत, त्याचा इतका गोंधळ करायची काय गरज आहे, ईडी, आयकर विभाग, केंद्रीय तपास यंत्रणा यांचा वापर करता आणि इथे पोलिसांनी साधी माहिती घ्यायची नाही का, अशी विचारणा छगन भुजबळ यांनी केली आहे. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्ब नंतर महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलंय. विशेष म्हणजे फडणवीस यांना पोलिसांनी पाठवलेल्या नोटीस नंतर भाजप आक्रमक झाली असून आज राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने, निदर्शने करण्यात आली. बीकेसी येथील सायबर विभागाकडून देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी तब्बल दोन तास चौकशी करण्यात आली.
 

Web Title: shiv sena sanjay raut and ncp chhagan bhujbal criticised bjp over devendra fadnavis notice issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.