Join us

उद्धव ठाकरे घेणार शरद पवारांची भेट?; राजकीय घडामोडींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 9:07 PM

भाजपाच्या या निर्णयानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलं आहे. यामुळे शिवसेनेच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.

मुंबई: भाजपा सत्तास्थापन करणार नाही असं भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या या निर्णयानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलं आहे. यामुळे शिवसेनेच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याचप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेणार असल्याची शक्यता सांगण्यात येत आहे.

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यावा यासाठी उद्धव ठाकरेशरद पवार यांची भेट घेण्यची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याआधी देखील शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आले होते. 

निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरल्याने राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. मात्र भाजपाकडे सत्तास्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा नसल्याने सरकार स्थापन करण्यास त्यांनी नकार दिला आहे. यामुळे आता राज्यपाल 56 जागा जिंकून निवडणुकीत दूसरा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला राज्यपाल सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेशरद पवारसंजय राऊतशिवसेनासोनिया गांधीकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस