Join us

“म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘भावी सहकारी’ असा शब्दप्रयोग केला”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 12:16 PM

मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा उल्लेख ‘भावी सहकारी’ असा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

ठळक मुद्देज्यांना भावी सहकारी व्हायचे आहे ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेतहे सरकार पूर्णपणे पाच वर्ष चालणार आहेशिवसेनेने कधी विश्वासघात केला नाही आणि करणारही नाही

मुंबई: मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा उल्लेख ‘भावी सहकारी’ असा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का, या चर्चेलाही उधाण आले. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजी-माजी-भावी सहकारी असा उल्लेख का केला, याबाबत भाष्य केले आहे. (shiv sena sanjay raut reaction cm uddhav thackeray comment on future colleagues)

“चंद्रकांत पाटील तीनपैकी एका पक्षात प्रवेश करणार असं माझ्या कानावर आलंय”: CM उद्धव ठाकरे

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एकूण घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. कुणीतरी आहे तिथे, त्यांना इथे यायचे आहे, असे सूचक विधानही संजय राऊत यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठावाड्यातील कार्यक्रमात जे वक्तव्य केले आहेत, ते ठाकरे शैलीत केले आहे. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी युती होईल असे कोणतीही वक्तव्य केले नाही, असे संजय राऊत म्हणाले. 

“शरद पवारांना राजी करण्यासाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते”; सचिन वाझेचं ED ला 'स्टेटमेंट'

स्पष्ट संकेत उद्धव ठाकरेंनी दिले 

ज्यांना भावी सहकारी व्हायचे आहे ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत, असे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. राजकारणात ज्या हालचाली दिसतायात विषेशतः चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाबाबात त्या हालचाली आहेत. कोणी तरी आहे तिथे त्यांना इथे यायचंय त्यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी संकेत दिले आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. 

ED च्या आरोपपत्रात १४ आरोपी, अनिल देशमुखांचे नावच नाही; नेमके कारण काय?

हे सरकार पूर्णपणे पाच वर्ष चालणार आहे

हे सरकार पूर्णपणे पाच वर्ष चालणार आहे. शिवसेनेने कधी विश्वासघात केला नाही आणि करणारही नाही. शिवसेना दिलेला शब्द मोडत नाही ही शिवसेनेची खासियात आहे. सरकार पडेल या भ्रमात राहू नये. कोणाला जर पंतग उडवायचे असतील त्यांनी ते पंतग उडवत बसावे, तो पतंग कसा कापायचा हे आम्हाला माहिती आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. 

‘भावी सहकारी’ म्हणाले ठाकरे, संभाव्य युतीचे वाजले नगारे; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

दरम्यान, राजकारणात राजकीय मतभेद असतात. आम्ही एकमेकांवर टीका करतो याचा अर्थ आम्ही कडवट दुष्मन असतो असे नाही. रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार एकत्र बसल्याने अडचण वाटण्याचे कारण नाही. ते दोघेही त्या भागातील मंत्री आहेत. दानवे आणि आम्हीही सोबत बसतो. राजकारणात कडवटपणा नसतो. उद्या फडणवीस भेटले तर त्यांच्याशी मी नक्कीच बोलेन. त्यांची ख्याली खुशाली विचारेन. उद्या मला त्यांच्या घरी जावेसे वाटले तर मी त्यांच्याकडे जाईन. एकमेकांचे तोंडच पाहायचे नाही, एकमेकांशी बोलायचेच नाही, असे महाराष्ट्रातील राजकारण नाही, असेही राऊत म्हणाले. 

टॅग्स :राजकारणसंजय राऊतउद्धव ठाकरेशिवसेनाभाजपा