“आमच्याकडे मोठी व्होट बँक, शिवसेनेचा आदर राखला गेला पाहिजे”; जागावाटपाबाबत शिंदे गट ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 08:22 PM2024-02-24T20:22:14+5:302024-02-24T20:22:43+5:30

Shiv Sena Shinde Group News: जागावाटपाचा आधीचा जो फॉर्म्युला आहे, त्यात मोठा बदल करून चालणार नाही, असे शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे.

shiv sena shinde group gajanan kirtikar reaction about mahayuti seat sharing discussion for lok sabha election 2024 | “आमच्याकडे मोठी व्होट बँक, शिवसेनेचा आदर राखला गेला पाहिजे”; जागावाटपाबाबत शिंदे गट ठाम

“आमच्याकडे मोठी व्होट बँक, शिवसेनेचा आदर राखला गेला पाहिजे”; जागावाटपाबाबत शिंदे गट ठाम

Shiv Sena Shinde Group News: लोकसभा निवडणूक अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपली असून, सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इंडिया आघाडी असो किंवा एनडीए, राज्यातील महाविकास आघाडी असो किंवा महायुती या सर्वच आघाड्यांवर जागावाटपावरून राजकीय वर्तुळात विविध फॉर्म्युले चर्चिले जात आहेत. यातच शिवसेनेचा आदर राखला गेला पाहिजे, असे स्पष्ट मत शिवसेना शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात आले आहे. 

भाजपा २६ आणि शिवसेना २२ असा जुना फॉर्मुला आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा समावेश झाल्यामुळे त्यांना जागा द्याव्या लागणार आहेत, त्यावर चर्चेतून तोडगा निघू शकतो. मुंबईत तीन जागा शिवसेनेच्या आणि तीन जागा भाजपाच्या असे आधीपासूनच ठरलेले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात २२-२६ या फॉर्म्युलाचा आधार आहे. या आधारावरच पुढील रणनीति ठरवली पाहिजे. त्यात फार मोठा बदल करून चालणार नाही, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी म्हटले आहे. 

आमच्याकडे मोठी व्होट बँक, योग्य आदर राखला गेला पाहिजे

पुढे बोलताना गजानन कीर्तिकर म्हणाले की, युतीमधील सर्व पक्षांनी एकमेकांचा आदर ठेवायला हवा. संपूर्ण महाराष्ट्रात आमची म्हणजेच शिवसेनेची मोठी व्होटबँक आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी ती व्होटबँक तयार केली आहे. शिवसेनेकडे एक विचारधारा आहे. शिवसेनेचे स्वतःचे हिंदुत्ववादी विचार आहेत. शिवसेना राष्ट्रीय भावना जपते, अशी देशभर तिची ओळख आहे. शिवसेनेकडे आक्रमक शैली आहे. मराठी माणसांचा सर्वांगीण विकास करणे ही शिवसेनेची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. महाराष्ट्रात शिवसेनेकडे मोठी व्होटबँक असल्यामुळे शिवसेनेचा तसा आदर राखला गेला पाहिजे, असे कीर्तिकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. या १८ जागांवर आम्ही ठाम आहोत. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे ४० आमदार आणि १३ खासदार आले आहेत त्यांना एकनाथ शिंदे यांनी संरक्षण दिले पाहिजे. त्यांना राजकीय स्थैर्य द्यायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. 
 

Web Title: shiv sena shinde group gajanan kirtikar reaction about mahayuti seat sharing discussion for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.