Join us

‘सागर’वर गेलेले तानाजी सावंत ताटकळले, मुख्यमंत्र्यांच्या भेटीची इच्छा मात्र अपुरीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 05:32 IST

तानाजी सावंत बंगल्यावर पोहोचले तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर त्यांना ताटकळत उभे राहावे लागल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. उद्या विधानभवनात भेटू, असे सांगून निघाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आरोग्य खात्यातील कंत्राटांना आपण स्थगिती दिली नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्याच्या दुसऱ्या दिवशी तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बंगल्यावर पोहोचले. मात्र मुख्यमंत्री हे भाजपच्या मंत्र्यांसोबत बैठकीत असल्याने तसा निरोप सावंत यांना देण्यात आला. भेट हवी असल्यास बैठक संपेपर्यंत थांबावे लागेल, असे सांगितल्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांना उद्या विधानभवनात भेटू, असे सांगून सावंत तिथून निघाले.

सावंत बंगल्यावर पोहोचले तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर त्यांना ताटकळत उभे राहावे लागल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. फडणवीसांच्या भेटीसाठी बंगल्यात जाण्याची परवानगी मिळावी याची ते बाहेर वाट पाहत होते. सावंत जवळपास पाच मिनिटे बंगल्याबाहेर उभे होते. यानंतर निरोप आल्याने सुरक्षा रक्षकांनी बंगल्याचे गेट उघडले आणि सावंत बंगल्यात गेले. पण त्यावेळी फडणवीस यांची भाजपच्या मंत्र्यांसोबत बैठक सुरू होती. 

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसतानाजी सावंतभाजपाशिवसेनामहायुतीराजकारण