Maharashtra Politics: “देवेंद्र फडणवीसांची प्रशासनावरील पकड ढिली, जबाबदारी झटकताय”; सुषमा अंधारेंनी डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 08:44 PM2022-09-23T20:44:46+5:302022-09-23T20:45:59+5:30

Maharashtra News: तळागाळातील जनता अजूनही उद्धव ठाकरेंसोबत असून, शिवसेना संपली म्हणता तर, गर्दी किती जमते ते आता पाहा, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

shiv sena sushma andhare criticised dcm devendra fadnavis after mumbai hc give permission of dasara melava at shivaji park to uddhav thackeray | Maharashtra Politics: “देवेंद्र फडणवीसांची प्रशासनावरील पकड ढिली, जबाबदारी झटकताय”; सुषमा अंधारेंनी डिवचलं

Maharashtra Politics: “देवेंद्र फडणवीसांची प्रशासनावरील पकड ढिली, जबाबदारी झटकताय”; सुषमा अंधारेंनी डिवचलं

googlenewsNext

Maharashtra Politics: मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत परवानगी दिल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात मोठा जल्लोष केला. शिवसेना भवन येथे मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले होते. यावेळी बोलताना शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह एकनाथ शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांची प्रशासनावरील पकड ढिली आहे. तुम्ही जबाबदारी झटकत आहात, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी डिवचले.

श्रद्धा आणि संयम या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पालिकेच्या आडून सत्तेचा गैरवापर केला जातोय. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. चेंगराचेंगरीची घटना घडली नाही. बीकेसीच्या मैदानात तो निर्माण होणार नाही का? बीकेसीचे मैदान घेऊन शिवाजी मैदान मागणे ही विकृती आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची पकड ढिली होते. गृहमंत्री म्हणून तुम्ही जबाबदारी झटकताय. तुम्हाला प्रशासनावरची पकड जमलेली नाही. याचा अर्थ सर्व काम मुख्यमंत्रीच करतात का, अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली आहे. 

शिवसेना संपली म्हणता तर, गर्दी किती जमते ते पाहा

शिवसेना संपली म्हणता तर, गर्दी किती जमते ते पाहा. अलिबाबांनी आमदार फोडले. ४० चोर सोबत गेले. आमदार फोडू शकलो. पण, तळागळातले लोकं फोडू शकलो नाही. हे लोकं अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच आहेत, असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला. भाजप नेते मोहित कंबोजनी ट्वीट करू नये. राणेंनी लगेच पत्रकार परिषदा घेऊ नये, असा खोचक सल्ला अंधारे यांनी दिला. 

दरम्यान, सदा सरवणकर हे खुलेआम गोळीबार करतात. त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. नारायण राणे म्हणतात मी हे मुश्कील करीन, मी ते मुश्कील करीन. ही गुंडगिरीची भाषा करणारे कोण?, प्रकाश सुर्वे हा कुणाचा आमदार. तो हातपाय तोडातोडीची भाषा करतो. त्यामुळं सदा सरवणकर, नारायण राणे, प्रकाश सुर्वे यांना लगाम घालण्यात सत्ताधारी कमी पडतात, असा आरोप अंधारे यांनी केला. 

 

Web Title: shiv sena sushma andhare criticised dcm devendra fadnavis after mumbai hc give permission of dasara melava at shivaji park to uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.