Maharashtra Politics: “देशात राजकीय स्वातंत्र्य, लोकशाही जिवंत आहे का?”; सदानंद कदम कारवाईवर आदित्य ठाकरे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 02:15 PM2023-03-10T14:15:05+5:302023-03-10T14:15:47+5:30

Maharashtra News: अशा कारवायांना आम्ही घाबरत नाही आणि घाबरण्याची गरजही नाही, असे सांगत आदित्य ठाकरेंनी टीकास्त्र सोडले.

shiv sena thackeray group aaditya thackeray criticised ed action on sadanand kadam in dapoli sai resort case | Maharashtra Politics: “देशात राजकीय स्वातंत्र्य, लोकशाही जिवंत आहे का?”; सदानंद कदम कारवाईवर आदित्य ठाकरे आक्रमक

Maharashtra Politics: “देशात राजकीय स्वातंत्र्य, लोकशाही जिवंत आहे का?”; सदानंद कदम कारवाईवर आदित्य ठाकरे आक्रमक

googlenewsNext

Maharashtra Politics: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथीली वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी रिसॉर्टचे मालक आणि उद्योजक सदानंद कदम यांना ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे. सदानंद कदम यांना ईडीने अटक केल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन दिली. सदानंद कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात. ईडीच्या या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. 

वादग्रस्त साई रिसॉर्टने मोठी राजकीय खळबळ उडवली आहे. या रिसॉर्टची वेगवेगळ्या पातळीवर चर्चा आहे. विविध उद्योगात यशस्वी असलेल्या या उद्योजकावर राजकीय वक्रदृष्टी असल्याने अशा पद्धतीची कारवाई अपेक्षितच केली जात होती. रिसॉर्ट हे समोर दिसणारे कारण असले तरी त्यामागे अन्य काही कारणेही असल्याची मोठी चर्चा आहे. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी बोलताना निशाणा साधला. 

देशात राजकीय स्वातंत्र, लोकशाही जिवंत आहे का?

देशभरातील विरोधकांवर तसेच जी लोक सरकारच्या विरोधात बोलतात, त्यांच्यावर अशा कारवाई होत आहे. अशा कारवायांना आम्ही घाबरत नाही आणि घाबरण्याची गरजही नाही, कारण सरकारला आमची भीती वाटते. आम्ही सगळे ‘इंसाफ के सिपाई’ म्हणून आम्ही लढत आहोत. असे प्रकार आता देशभरात सुरू आहेत. त्यामुळे देशात राजकीय स्वातंत्र आणि लोकशाही जिवंत आहे का? असा प्रश्न पडतो, असे सांगत आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला. तसेच गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरेंसह देशभरातील विरोधाकांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले होते. महाराष्ट्रातही ज्यांनी गद्दारी केली. त्यांच्याविरोधातील प्रकरणे आता शांत झाली आहेत. जे लोक आमच्या बरोबर आहेत, त्यांच्याविरोधात खोटी तडीपारीची नोटीस आणि खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. अशा प्रकारे कोणतेही राज्य चालू शकत नाही, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला. 

दरम्यान, शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी जात विचारली जात असल्याची घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, देशात आणखी किती वाद निर्माण करायचे, हे आता सरकारने ठरवले पाहिजे. आम्ही कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. कदाचित केंद्र सरकारला यातून माहिती गोळा करायची असेल. पण हे सर्व होत असताना ज्याला हिंदुस्थानी म्हणून आपली जात लिहायची आहे, ते तसेही लिहू शकतात, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena thackeray group aaditya thackeray criticised ed action on sadanand kadam in dapoli sai resort case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.