“लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागा, गाफील राहू नका”; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 07:53 PM2023-11-09T19:53:35+5:302023-11-09T19:54:32+5:30

Uddhav Thackeray News: मातोश्रीवर झालेल्या बैठकीत ग्रामपंचायत निवडणुका, आरक्षण यांसह अनेकविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

shiv sena thackeray group chief uddhav thackeray held meeting on matoshree and order for get ready to lok sabha election 2024 | “लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागा, गाफील राहू नका”; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश 

“लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागा, गाफील राहू नका”; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश 

Uddhav Thackeray News: नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे पाहायला मिळाले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक घेतल्याचे वृत्त आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिल्याचे समजते. 

मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत जवळपास दोन तास राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. तसेच उपस्थित पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरे यांनी सविस्तर संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करताना, शिवसैनिकांना लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले. आजपासूनच निवडणुकीच्या कामाला लागा. गाफील राहू नका, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा. निवडणुकीचे नियोजन करा

लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा. निवडणुकीचे नियोजन करा, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, राजन विचारे, अनिल परब, रवींद्र वायकर आणि सुभाष देसाई उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची जोमाने तयारी सुरू  झाली आहे. 

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेसह पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनी महाराष्ट्रभर दौरे करण्याचा निर्णय घेण्यता आला. दिवाळीनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे महाराष्ट्रात दौरे होणार आहेत. निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून सभांचे नियोजन केले जाणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षण, ग्रामपंचायत निवडणूक निकाल यासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते.

 

Web Title: shiv sena thackeray group chief uddhav thackeray held meeting on matoshree and order for get ready to lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.