Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहात का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 04:04 PM2022-11-10T16:04:37+5:302022-11-10T16:06:27+5:30

Maharashtra News: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

shiv sena thackeray group sanjay raut reaction over will he meet cm eknath shinde | Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहात का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले...

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहात का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले...

googlenewsNext

Maharashtra Politics: कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. १०० दिवसानंतर संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले. जामीन मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी संजय राऊत यांनी आपले अनुभव कथन केले. तर, उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांवरील कारवाईवरून भाजपवर टीकास्त्र सोडले. 

आम्ही एकच कुटुंब आहोत. तुरुंगात गेलो, तेव्हा हे सगळे माझ्या कुटुंबाची काळजी घेतील, हा मला विश्वास होता. आमची शिवसेना मूळ आहे. पक्षासाठी दहावेळा तुरुंगात टाकले तरी मी जायला तयार आहे. पक्षासाठी त्याग करायची वेळ आल्यावर त्याग करावा लागतो. मला जे काही मिळाले आहे, ते त्यांच्यामुळे मिळाले आहे. आम्ही कितीही मोठे झालो, तरी ज्यांनी दिले, त्या पक्षाशी बेईमानी करणे, पाठीत खंजीर खुपसणे, हे आमच्या रक्तात नाही, असे संजय राऊतांनी ठामपणे सांगितले. यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार का, असा प्रश्न विचारला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहात का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत विचारणा केली असता संजय राऊत यांनी त्यावर थेट बोलणे टाळले. मात्र, देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे. माझे जे शासकीय काम आहे, ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या खात्यांकडे आहे. त्यामुळे मी त्यांची भेट घेणार आहे. काही राज्याचे प्रश्न आहेत. त्यांच्यासमोर काही प्रश्न मांडायचे आहेत. ते राज्याचे प्रमुख आहेत, गृहमंत्री आहेत. तुरुंगातील काही प्रश्न त्यांच्यासमोर मांडायचे आहेत. त्यांना भेटण्यात काही गैर नाही. ते राज्याचे प्रमुख आहेत, पक्षाचे नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांसोबत मांडवली करायची असती, तर इतके दिवस संजय तुरुंगात राहिले नसते. आप, केसीआर, सोरेन आणि ममता दीदींना भाजप छळत आहे. हे सगळे एकत्र आल्यावर काय होईल, हे भाजपला दिसत नाही. आम्ही संजय, सुनिल, आई, वहिनी आणि मुलींचही कौतुक करेल. त्यांनीही मोठा लढा दिला आहे. मी मधल्या काळात भावूक झालो होतो, त्याला तुरुंगात भेटायचं होतं, पण ते शक्य नाही झाले. हा खडतर काळ त्याच्यासाठी होता, तसाच आमच्यासाठीही होता, असे त्यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena thackeray group sanjay raut reaction over will he meet cm eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.