पश्चिम उपनगरात पेट्रोल - डिझेल भाववाढी विरोधात शिवसेना उतरली रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 05:07 PM2020-12-10T17:07:50+5:302020-12-10T17:08:35+5:30

Against petrol-diesel price hike : केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध

Shiv Sena took to the streets against petrol-diesel price hike in the western suburbs | पश्चिम उपनगरात पेट्रोल - डिझेल भाववाढी विरोधात शिवसेना उतरली रस्त्यावर

पश्चिम उपनगरात पेट्रोल - डिझेल भाववाढी विरोधात शिवसेना उतरली रस्त्यावर

Next


मुंबई : पेट्रोल डिझेलची विक्रमी भाववाढ करणाऱ्या  केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी पश्चिम उपनगरात शिवसेना आज रस्त्यावर उतरली. पश्चिम उपनगरात आज दुपारी पेट्रोल डिझेल भाववाढी विरोधात गोरेगाव,बोरिवली स्टेशनच्या बाहेर शिवसेनेने जोरदार निदर्शने केली.

 शिवसेना नेते व उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन किर्तीकर यांच्या मार्गर्शनाखाली आणि शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, प्रवक्ता,आमदार, विभागप्रमुख सुनिल प्रभु व महिला विधानसभा संघटक व जेष्ठ नगरसेविका साधना माने यांच्या नेतृत्वाखाली  शिवसेना विभाग क्रमांक ०३ तर्फे  जोरदार निदर्शने करून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजीने गोरेगाव स्टेशन परिसर दणाणून गेला होता.

यावेळी उपमहपौर अँड.सुहास वाडकर,बेस्ट समितीचे अध्यक्ष प्रविण शिंदे,नगरसेवक बाळा नर,तुळशीराम शिंदे, स्वप्नील टेंबवलकर, आत्माराम चाचे, विनया  सावंत, रेखा रामवंशी, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, विष्णू सावंत, राजू पाध्ये, प्रशांत कदम,महिला विधानसभा संघटक पूजा चौहान, रीना सुर्वे, शालिनी सावंत, स्नेहा गोलतकर, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, शाखासंघटक, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, यूवासेना पदाधिकारी, भाविसे, ग्राहक संरक्षण कक्ष सर्व पदाधिकारी, महिला आघाडी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना विभाग क्र -१ तर्फे बोरीवली स्थानक (पूर्व) येथे केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या पेट्रोल व डिझेल,घरगुती गॅसच्या महागाई विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

याप्रसंगी विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे, विभाग संघटक सुजाता शिंगाडे, मागाठाणे विधानसभा प्रमुख उदेश पाटेकर, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, विधी समिती अध्यक्ष हर्षद कारकर, प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, नगरसेवक संजय घाडी, बाळकृष्ण ब्रीद, नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, शीतल म्हात्रे ,रिद्धी खुरसंगे, उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे, दामोदर म्हात्रे,पांडुरंग देसाई, चेतन कदम, सुनील डहाळे ,महिला उपविभागसंघटक शकुंतला शेलार,अश्विनी सावंत,वंदना खाडे,मिना पानमंद,मुंबई बॅंकचे  संचालक अभिषेक घोसाळकर विभागातील सर्व पुरुष व महिला शाखाप्रमुख, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: Shiv Sena took to the streets against petrol-diesel price hike in the western suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.