पश्चिम उपनगरात पेट्रोल-डिझेल भाववाढीविरोधात शिवसेना उतरली रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:24 AM2020-12-11T04:24:15+5:302020-12-11T04:24:15+5:30

मुंबई : पेट्रोल डिझेलची विक्रमी भाववाढ करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी पश्चिम उपनगरात शिवसेना रस्त्यावर उतरली. पश्चिम ...

Shiv Sena took to the streets against petrol-diesel price hike in the western suburbs | पश्चिम उपनगरात पेट्रोल-डिझेल भाववाढीविरोधात शिवसेना उतरली रस्त्यावर

पश्चिम उपनगरात पेट्रोल-डिझेल भाववाढीविरोधात शिवसेना उतरली रस्त्यावर

Next

मुंबई : पेट्रोल डिझेलची विक्रमी भाववाढ करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी पश्चिम उपनगरात शिवसेना रस्त्यावर उतरली. पश्चिम उपनगरात पेट्रोल, डिझेल भाववाढीविरोधात गोरेगाव, बोरीवली स्थानकाबाहेर शिवसेनेने जोरदार निदर्शने केली.

शिवसेना नेते व उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, प्रवक्ता, आमदार, विभागप्रमुख सुनील प्रभू व महिला विधानसभा संघटक व ज्येष्ठ नगरसेविका साधना माने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना विभाग क्रमांक ३ तर्फे जोरदार निदर्शने करून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी उपमहापौर ॲड. सुहास वाडकर, बेस्ट समितीचे अध्यक्ष प्रवीण शिंदे, नगरसेवक बाळा नर, तुळशीराम शिंदे, स्वप्निल टेंबवलकर, आत्माराम चाचे, विनया सावंत, रेखा रामवंशी, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, विष्णू सावंत, राजू पाध्ये, प्रशांत कदम, महिला विधानसभा संघटक, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, शाखा संघटक, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, युवा सेना पदाधिकारी, भाविसे, ग्राहक संरक्षण कक्ष सर्व पदाधिकारी, महिला आघाडी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना विभाग क्र.-१ तर्फे बोरीवली स्थानक (पूर्व) येथे केंद्रातील भाजप सरकारने लादलेल्या पेट्रोल

व डिझेल तसेच घरगुती गॅसच्या महागाईविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

याप्रसंगी विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे, विभाग संघटक सुजाता शिंगाडे, मागाठाणे विधानसभा प्रमुख उदेश पाटेकर, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, विधी समिती अध्यक्ष हर्षद कारकर, प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, नगरसेवक संजय घाडी, बाळकृष्ण ब्रीद, नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, शीतल म्हात्रे, रिद्धी खुरसंगे, उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे, दामोदर म्हात्रे, पांडुरंग देसाई, चेतन कदम, सुनील डहाळे, मुंबै बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर, विभागातील सर्व पुरुष व महिला शाखाप्रमुख, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----------------------------------

Web Title: Shiv Sena took to the streets against petrol-diesel price hike in the western suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.