लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राजस्थानमध्ये 下अनोप载 मंडळाने जैन समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ काल शिवसेनेने 下गोरेगावमध्ये载 आंदोलन आयोजित केले होते. जैन समाजाच्या समर्थनात रस्त्यावर उतरून शेकडो शिवसैनिकांनी आक्रोश व्यक्त केला. यावेळी जैन समुदायातील बांधवांसह 下गोरेगावमधील载 शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
धर्मनाथ जैन देरासर, जवाहरनगर, गोरेगाव पश्चिम येथे 下हे载 आंदोलन करण्यात आले. 下या载 आंदोलनात शिवसेनेच्या महिला विभाग संघटक व ज्येष्ठ नगरसेविका साधना माने तसेच समीर देसाई, राजू पाध्ये, दिलीप शिंदे, मकरंद म्हात्रे, दीपक सुर्वे, दिनेश राव, 下कल्पिता载 तावडे, जैन समाजाचे भूषण मेहता, 下इंद्रवर्धन载 जैन, 下मन्नूभाई载 शहा, 下बद्रीभाई载 जोगानी, रमेश शेठ, गोरेगाव मर्चंट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष 下बिरेन载 下लिंबाचीया载 यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.
दरम्यान, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह जैन समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी यावेळी सदर वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला. दरम्यान, निषेध आंदोलनात बोलताना 下बिरेन载 लिंबाचिया यांनी सांगितले की, 下आज载 अनेक पक्ष असताना व कुठलाही पक्ष पुढे येत नसताना फक्त 下शिवसेनेनेच载 अनुप मंडळाच्या वक्तव्याचा विरोध केला आहे. शिवसेना प्रत्येकवेळी जैन समाजाच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिली आहे. जैन समाज 下हा载 शांत समाज असून, मुंबई, महाराष्ट्रसह संपूर्ण देशावर संकट येते त्यावेळी जैन समाज एकजुटीने उभा राहत असतो, असेही लिंबाचिया यांनी सांगितले.
- ----------------**************---