'शिवसेना तुम आगे बढो...'; आदित्य ठाकरेंना पाहताच चिमुकला धावला, शेक हँड केलं अन् घोषणाबाजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 08:28 AM2022-09-03T08:28:32+5:302022-09-03T08:30:15+5:30
राज्यात महापालिका निवडणुकांचा पडघम वाजू लागलेले असताना प्रत्येक राजकीय पक्षाकडून गणेशोत्सवाच्या माध्यमातून सदिच्या भेटींची राजकीय पेरणी सुरू झाली आहे.
मुंबई-
राज्यात महापालिका निवडणुकांचा पडघम वाजू लागलेले असताना प्रत्येक राजकीय पक्षाकडून गणेशोत्सवाच्या माध्यमातून सदिच्या भेटींची राजकीय पेरणी सुरू झाली आहे. मग ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत किंवा मग विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेले नेते असोत. सर्वजण गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपापल्या मतदार संघात गणेशोत्सव मंडळांना भेटी देत आहेत. यात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेही मागे राहिलेले नाहीत. पक्षात उभी फूट पडल्यानंतर पक्ष बांधणीसाठी आदित्य ठाकरे याआधीपासूनच मैदानात उतरले आहेत. आता गणेशोत्सवात देखील ते मुंबईतील विविध मंडळांच्या आणि कार्यकर्त्यांच्या घरच्या बाप्पांना भेटी देत आहेत.
आदित्य ठाकरे गिरगावमधील एका गणेशोत्सव मंडळाला भेट देण्यासाठी पोहोचले असता एका चिमुकल्यानं त्यांना पाहिलं आणि 'शिवसेना तुम आगे बढो, हम तुम्हारे...' अशी घोषणा दिली. चिमुकल्याच्या कृतीनं सर्वच क्षणभर पाहत राहिले आणि आदित्य ठाकरेंच्या चेहऱ्यावरही चिमुकल्याचा उत्साह पाहून स्मितहास्य पाहायला मिळालं. सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आदित्य ठाकरेंनीही चिमुकल्याचा हात पकडून त्याला गणेश दर्शनाला सोबत नेलं. तसंच त्याच्याशी गप्पाही मारल्या. त्याची विचारपूस केली. मग छानसं फोटेसेशनही झालं.
VIDEO: 'शिवसेना तुम आगे बढो...'; आदित्य ठाकरेंना पाहताच चिमुकला धावला, शेक हँड केलं अन् घोषणाबाजी! pic.twitter.com/tXRIlmnjGx
— Lokmat (@lokmat) September 3, 2022
आदित्य ठाकरे गिरगावमधील शिवसेना शाखाप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले. त्यावेळी चिमुकल्यानं आदित्य ठाकरे आल्यानंतर त्यांच्यासमोरच घोषणा दिली. हात उंचावून त्यानं 'शिवसेना तुम आगे बढो', असं म्हटलं आणि आदित्य ठाकरे देखील चिमुकल्याचा उत्साह पाहातच राहिले. आदित्य ठाकरेंनी चिमुकल्याचा हात धरला आणि तू कितवीस आहेस, असं विचारलं. नंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात या चिमुरड्याचा हात धरुनच आदित्य ठाकरे आतमध्ये आले. शेवटी या चिमुरड्यासोबत त्यांनी फोटोसेशनही केलं.