Aaditya Thackeray Morcha Vs BJP Morcha Live : तुम्ही मला पप्पू बोलता ना,,, हा पप्पू तुम्हाला चॅलेंज देतोय,, या अंगावर. एकटे या एकत्र या. छातीवर वार करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 18:32 IST2023-07-01T07:37:07+5:302023-07-01T18:32:08+5:30
मुंबई : ऊन असो वा पाऊस असो मोर्चा निघणारच!, असं म्हणत आज उद्धव ठाकरे गटाकडून ( Uddhav Thackeray Group) मुंबई ...

Aaditya Thackeray Morcha Vs BJP Morcha Live : तुम्ही मला पप्पू बोलता ना,,, हा पप्पू तुम्हाला चॅलेंज देतोय,, या अंगावर. एकटे या एकत्र या. छातीवर वार करा
मुंबई : ऊन असो वा पाऊस असो मोर्चा निघणारच!, असं म्हणत आज उद्धव ठाकरे गटाकडून ( Uddhav Thackeray Group) मुंबई महापालिका (BMC) मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा निघणार असून मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मरीन लाईन्सपासून ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाच्या मोर्चाच्या प्रत्युत्तरात भाजपाने आक्रोश आंदोलन पुकारले होते. मात्र, बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघाताच्या घटनेमुळे हे आंदोलन न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. यासंदर्भात माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
05:26 PM
हे भगव वादळ फक्त मुंबईतील आहे, महाराष्ट्रातील अजून सुरू केलेलं नाही; आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे म्हणाले, आपला उत्साह पाहिल्यानंतर, आक्रोश पाहिल्यानंतर मी एकच सांगेन समझनेवाले को इशारा काफी है. आज जे भगवे वादळ आलेय नुसत्या मुंबईचे आहे. अजून महाराष्ट्रात सुरुवात केलेली नाहीय.
हनुमानाचे दर्शन घेऊन आलोय, मनात एकच घोळत होते. ही जी भूत पिशाच्च पालिकेच्या आजुबाजुला फिरत आहेत त्यांना पळवून लावायची आहेत. आज मुंबई पालिकेची शहराची परिस्थिती काय आहे, गेल्या २५ वर्षांत आम्ही जी जी कामे केली ती जगासमोर आणली. पण एक वर्ष झाले नगरसेवक नाहीएत. दालनांना कुलुपे लागली आहेत, असंही ठाकरे म्हणाले.
'अधिकारी खोके सरकारचे फोन आले की घेतात आणि जातात. आज तुम्ही नागरीक म्हणून कामासाठी गेलात तर तुम्हाला जेवणाची सुट्टी झालीय, वरून फोन आलाय, कामात आहोत, अशी कारणे सांगतात. या अधिकाऱ्यांना कोणाकोणाचे फोन येतात. बिल्डरांच्या कामांत व्यस्त ठेवले जाते. हे अधिकारी सांगत असतात की लवकर निवडणुका घेण्यासाठी प्रयत्न करा, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
विधानभवनात हा विषय घेतला, राज्यपालांकडे गेलो. नवीन राज्यपालांकडे गेलो. जुन्यांकडे गेलो तर आणखी किती महापुरुषांचा अपमान केला असता माहिती नाही. आम्ही राज्यपालांकडे गेलो भ्रष्टाचारावर चौकशी झाली पाहिजे, असे सांगितले. यावर राज्यपालांनी आम्ही विचार करू असे सांगितले.
मुंबईवर एसआयटी लावला तशी ठाण्यावर लावा, पुण्यावर लावा, नागपूरमध्ये लावा, असे आम्ही पुन्हा राज्यापालांना भेटून सांगणार आहोत. तुम्ही बघितले तर मुंबईत फक्त होर्डिंग दिसतायत. यामध्ये दोन फोटो असतात अलिबाबाचा एक असतो. एक दोन नगरसेवकांना फोन गेलेत, त्यांना आयपीएस अधिकारी फोन करत आहेत त्यांना ऑफर आलीय असे सांगत आहेत. त्यांचे रेकॉर्डिंग हाती आलेले आहे. ते वेळ आली की समोर आणू.
पहिला घोटाळा म्हणजे रस्त्यांचा घोटाळा होता. सर्वांना कळला पाहिजे. कारण तुमच्या आमच्या सर्वांच्या पैशांतून झाला आहे. तुम्ही निवेदन वगैरे देणार आहात का असे विचारले गेले, मी म्हणालो चोरांना काय निवेदन द्यायचे. तुम्ही जी चोरी केलीय ती आमच्या नजरेत आलीय, ज्या दिवशी आमचे सरकार आले त्या दिवशी पोलीस आणि आम्ही आत घुसणार आणि अटक करणार, असंही ठाकरे म्हणाले.
05:15 PM
आत्ता निवडणुका घ्या, चोर कोण आणि शोर कुणाचा हे कळेल: संजय राऊत
संजय राऊत म्हणाले, सकाळपासून सर्वांना चिंता होती, धो -धो पाऊत पडेल आणि मोर्चाचे काय होईल. पण इथे शिवसैनिकांचा पाऊस पडलाय. आम्हाला सूर्यदेवतेने आशिर्वाद दिले आहेत.
आदित्य ठाकरे येताना हनुमानाच्या पाया पडले. बजरंगबली कर्नाटकात नाही पावला, पण आम्हाला मुंबईत आदित्य यांना गदा दिलीय. २०२४ मध्ये अशी ही गदा गरा गरा फिरवायची की या सर्वांना नेस्नाभूत करा.मुंबई महापालिकेवर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी फडकत ठेवला ते उतरविण्यासाठी मुंबईतील दोन बोके आणि महाराष्ट्रातील खोके कारस्थाने करत आहेत. हे सांगण्यासाठीच हा मोर्चा आहे. भाजपाची मोदी, शाह, फडणवीस यांची एकच इच्छा आहे, भ्रष्टाचार करायचा असेल तर आमच्या पक्षात या आणि स्वाभिमानाने करा. दुसऱ्या पक्षात राहिलात तर तुरुंगात जाल, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
आमची एकच मागणी आहे. निवडणुका घ्या. चोर कोण आणि शोर कोणाचा हे तुम्हाला लगेचच कळेल. ड्रोनच्या माध्यमातून हा विराट मोर्चा पहा. नाही तुमच्या डोळ्यातील बुब्बुळे बाहेर आली तर पहा. या लोकांना जाड भिंगाचा चष्मा आणून द्या. मुंबईसाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान केलेले ते स्मारक बाजुलाच आहे. ते हुतात्मे आज आपल्याकडे आशेने पाहत आहेत.
आज महापालिका बंद असेल. शनिवार आहे, परंतू काही उंदीर बिळातून पाहत असतील शिवसेनेचा हा मोर्चा किती मोठा आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
05:09 PM
चोर मचाये शोर म्हणणारे २५ वर्ष कुठे होते: आमदार सुनिल प्रभू
'ठाकरे गटाच्या मोर्चाच्या ठिकाणी आमदार सुनिल प्रभु यांनी मनोगत व्यक्त केले . यावेळी त्यांनी भाजप तसेच शिंदे गटावर टीका केली. सुनिल प्रभू म्हणाले, मागिल एक वर्षापासून मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार केला आहे, त्याविरोधात आम्ही हा मोर्चा काढला आहे.
'त्यांचा मोर्चा हा चोर मचाये शोर नव्हता तर या चोरांच्या उलट्या बोंबा हा त्यांनी मोर्चा काढणार होते, असंही प्रभू म्हणाले.
04:58 PM
ठाकरे गटाने मोर्चाची सुरुवात श्रद्धांजली वाहून केली
ठाकरे गटाने मोर्चाची सुरुवात समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहून केली.
04:19 PM
ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक आक्रमक
04:18 PM
विभागक्रमांक १ मधून ३००० शिवसैनिक मोर्चाला रवाना
विभागक्रमांक १ मधील दहिसर,बोरिवली आणि मागाठाणे या तीन विधानसभा क्षेत्रातील सुमारे ३००० शिवसैनिक व महिला मोर्चासाठी दुपारी खचाकच भरलेल्या ट्रेन मधून मोर्चासाठी रवाना झाल्या.तापूर्वी बोरिवली स्थानकात शिवसैनिक व महिलांनी गगनभेदी घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला होता.
आमदार विलास पोतनीस,विभागप्रमुख उदेश पाटेकर,महिला विभागसंघटक सुजाता शिंगाडे आणि यांच्या सह विभाग संघटक,विभाग समन्वयक,उपविभागप्रमुख विनायक सामंत आणि इतर उपविभागप्रमुख,शाखाप्रमुख,उपशाखाप्रमुख,गटप्रमुख मोठ्या संख्येने मोर्चाला रवाना झाले. आम्ही बोरिवली वरून २.४७ ची चर्चगेट जलद लोकल पकडली.आणि आता मरीनलाईन्स स्टेशनला उतरलो असून पुढे चालत मेट्रो सिनेमागृहाकडे मोर्चात सहभागी होणार असल्याचे उपविभागप्रमुख विनायक सामंत यांनी लोकमतला सांगितले.
04:18 PM
ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक आक्रमक LIVE
04:05 PM
विभागक्रमांक १ मधून ३००० शिवसैनिक मोर्चाला रवाना
विभागक्रमांक १ मधील दहिसर,बोरिवली आणि मागाठाणे या तीन विधानसभा क्षेत्रातील सुमारे ३००० शिवसैनिक व महिला मोर्चासाठी दुपारी खचाकच भरलेल्या ट्रेन मधून मोर्चासाठी रवाना झाल्या.तापूर्वी बोरिवली स्थानकात शिवसैनिक व महिलांनी गगनभेदी घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला होता.
आमदार विलास पोतनीस,विभागप्रमुख उदेश पाटेकर,महिला विभागसंघटक सुजाता शिंगाडे आणि यांच्या सह विभाग संघटक,विभाग समन्वयक,उपविभागप्रमुख विनायक सामंत आणि इतर उपविभागप्रमुख,शाखाप्रमुख,उपशाखाप्रमुख,गटप्रमुख मोठ्या संख्येने मोर्चाला रवाना झाले. आम्ही बोरिवली वरून २.४७ ची चर्चगेट जलद लोकल पकडली.आणि आता मरीनलाईन्स स्टेशनला उतरलो असून पुढे चालत मेट्रो सिनेमागृहाकडे मोर्चात सहभागी होणार असल्याचे उपविभागप्रमुख विनायक सामंत यांनी लोकमतला सांगितले.
03:35 PM
ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात
ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली आहे, पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
02:32 PM
आज महापालिकेवर मोर्चा काढणारच : अरविंद सावंत
बुलढाण्याच्या दुर्घटनेनंतर मोर्चा निघणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. पण, महापालिकेवर मोर्चा काढणारच, असे ठाकरे गटाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
12:10 PM
भाजपाचं आक्रोश आंदोलन स्थगित, आशिष शेलार यांची माहिती
ठाकरे गटाकडून मुंबई महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. याला प्रत्त्युत्तर म्हणून भाजपाने आक्रोश आंदोलन पुकारले होते. मात्र, बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात घटनेमुळे हे आंदोलन न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. यासंदर्भात माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
बुलढाण्यातील अत्यंत वेदना देणाऱ्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 1, 2023
महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
दु:खाचा.डोंगर कोसळेल्या कुटुंबासोबत आमच्या ही सहवेदना!
स्वतः मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांनी सुध्दा शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
तर मा.…
11:19 AM
मोर्चावर पोलिसांनी घातलेल्या काही अटी
१. मोर्चा दिलेल्या मार्गावरुनच नेण्यात यावा व कोणत्याही परिस्थितीत मार्ग बदलू नये. मोर्चा निघाल्यानंतर मार्गावर रेंगाळत ठेवू नये.
२. मोर्चा / सभेदरम्यान कोणत्याही व्यक्तीच्या समुदायाच्या धार्मीक /जातीय/ सामाजीक / राजकीय भावना दुखावल्या जातील अशा आक्षेपार्ह प्रतिमांचे, देखाव्यांचे, बॅनरचे प्रदर्शन करणे, घोषणा देणे, आक्षेपार्ह व अश्लील गाणे अथवा वाद्य वाजविणे किंवा तत्सम प्रकार करता येणार नाहीत. मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येतांना व परत जातांना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.
३. नमुद आयोजित कार्यक्रमापूर्वी आवश्यक असलेल्या इतर शासकीय विभागाचे आवश्यक ते परवाने प्राप्त करावेत. तसेच आपले तर्फे उभारण्यात आलेल्या स्टेजचे संबंधीत ठेकेदाराकडून तसेच सार्वजनिक बांधकाम स्टेज स्टॅबिलीटी प्रमाणपत्र प्राप्त करून, सर्व परवाने आझाद मैदान पोलीस ठाणे येथे कार्यक्रमा पूर्वी सादर करावेत.
४. मार्चमध्ये बोलावलेल्या सर्व वाहनांना पोलीसांनी दिलेल्या मार्गाने प्रवास करण्याचा व मार्ग न बदलण्याच्या सुचना द्याव्यात वाहनांनी शहरात प्रवासा दरम्यान त्या त्या रस्त्यावर विहीत वेगमर्यादिचे पालन करावे. मार्चमध्ये आलेल्या नागरीकांना त्यांचे वाहने (दोन चाकी, चार चाकी व इतर कोणतेही वाहन) पार्कंगसाठी निर्धारीत केलेल्या ठिकाणीच पार्किंग करण्याच्या सुचना द्याव्यात.
५. मार्चासाठी येताना अथवा परत जातांना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रॅली काढू नये. त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री यांना अधिकृत सुरक्षा पुरविण्यात आली असून आयोजकांनी त्यांच्या मोर्च्याच्या तसेच सभेच्या ठिकाणी येण्याच्या व सभेवरुन परत जाण्याच्या वेळी कोणतीही रॅली काढू नये.
६. सभेचे ठिकाणी पुरेशे अग्निशमन दल हजर राहील याची दक्षता घ्यावी. सभेचे ठिकाणी महानगर पालिका यांचेशी संपर्क साधून अग्निशमन यंत्रणा व आवश्यक Portable Fire Extinguisher यंत्र राहतील याची दक्षता घ्यावी.
७. मोर्च्याच्या दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, लाठी, पुतळे इत्यादी बाळगू, नये अगर प्रदर्शन करू नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये.
८. मोर्चा / सभेचे ठिकाणी रुग्णवाहीकेची व्यवस्था करावी. तसेच तात्पुरते वैद्यकीय सेवा, वैद्यकीय अधिकारी व आपात्कालीन व्यवस्थेचे आयोजन करावे.
11:10 AM
"खा लो महापालिका, चलो महापालिका..!", आशिष शेलार यांचा निशाणा
ठाकरे गटाकडून मुंबई महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. उबाठा गट आज स्वतःच्या विरोधात देईल ते नारे ऐका... असे म्हणत आशिष शेलार यांनी काही घोषणा ट्विटद्वारे पोस्ट केल्या आहेत.
मुंबईकर हो,
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 1, 2023
उबाठा गट आज स्वतःच्या विरोधात देईल ते नारे ऐका...
■खा लो महापालिका
चलो महापालिका..!
■अरे, आवाज कुणाचा?
पालिका खाणाऱ्यांचा!
■देखो देखो कौन आया?
नाले का कीचङ खानेवाला शेर आया!
■ मुंबईकरांचे 3 लाख कोटींचे खोके गेले कुठे?
खाऊन पिऊन सगळं ok !
भ्रष्टाचाराची यांची…
07:40 AM
ठाकरे गटाचे आमदार, खासदार उपस्थित असणार
ठाकरे गटाच्या मोर्चाचे नेतृत्व आमदार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे करणार असून यामध्ये मुंबईतील सर्व ठाकरे गटाचे आमदार, खासदार उपस्थित असणार आहेत..
07:43 AM
भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्याच्या सूचना
ठाकरे गटाच्या आमदार खासदारापासून ते विभाग प्रमुख, विधानसभा समन्वयक, शाखाप्रमुख ,गट प्रमुख अगदी सर्व सामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा या मोर्चात सहभागी होण्याच्या आणि मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
08:04 AM
राज्य सरकारचा बीएमसीमधील 88 हजार कोटींच्या ठेवीवर डोळा
मुंबई महापालिकेतल्या 88 हजार कोटींच्या ठेवीवर राज्य सरकारचा डोळा असून मुंबईची वाट लावण्याचे काम केले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेमध्ये सहा हजार कोटींचा रस्ते घोटाळा, 263 कोटींचा स्ट्रीट फर्निचर घोटाळा, खडी घोटाळा, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन घोटाळा, रोषणाई, वाढते वीज बिल या सगळ्याविरोधात हा मोर्चा काढला जात आहे.
08:29 AM
जाब विचारण्यासाठी हा मोर्चा - उद्धव ठाकरे
मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मुंबई महापालिकेच्या ठेवी म्हणजेच जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरु आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
09:57 AM
'सुशांत सिंह राजपूतला न्याय द्या'
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून मोर्चाची हाक देण्यात आली आहे. तत्पूर्वीच वातावरण तापले आहे. 'सुशांत सिंह राजपूतला न्याय द्या', मुंबई पालिकेच्या आवारात फलक झळकले आहेत.
08:32 AM
भाजपच्या कार्यालयातून 'चोर मचाये शोर' मोर्चाला सुरुवात होणार
भाजपच्या नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयातून शनिवारी या मोर्चाला सुरुवात होणार आहे. ठाकरेंविरोधात भाजप शक्तिप्रदर्शन करणार आहे. गेल्या 25 वर्षात सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जो भ्रष्टाचार केला, त्याची पोलखोल महायुती या प्रत्युत्तर मोर्चातून करणार आहे, असे भाजयुमोतर्फे सांगण्यात आले आहे.