"बात घमंड की नहीं...", राहुल कनाल यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे गटावर केला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 06:05 PM2023-07-01T18:05:02+5:302023-07-01T18:05:56+5:30

राहुल कनाल यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

 Shiv Sena Uddhav Balasaheb party leader Aditya Thackeray's close aide Rahul Kanal has joined Shiv Sena in the presence of Eknath Shinde  | "बात घमंड की नहीं...", राहुल कनाल यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे गटावर केला गंभीर आरोप

"बात घमंड की नहीं...", राहुल कनाल यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे गटावर केला गंभीर आरोप

googlenewsNext

मुंबई : माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत कनाल यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 'बात घमंड की नही बात इज्जत की है, लोगों ने अपने लहजे बदल दिए तो हमने अपने रास्ते बदल दिए' असं म्हणत त्यांनी नाव न घेता आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.

कोविड काळात केलेल्या कामाचा दाखला देत राहुल कनाल यांनी एकनाथ शिंदेंचे कौतुक केले. "कोविड काळात शिंदे साहेबांच्या सहकार्याने आम्ही खूप काम केलं. पण पक्षातील दोन तीन लोकांनी खूप वाईट राजकारण केलं. काही जण म्हणतात की, मला पार्टीने खूप काही दिले आहे, पण मी सांगतो की मी देखील त्याच्या हजार पटीने दिले आहे. आम्ही कोरोना काळात शिंदे साहेबांप्रमाणे सगळ्यांची सेवा केली. कोविडमध्ये फक्त सेवा केली आहे, त्यामुळे मेवाचा आणि माझा काहीही संबंध नाही", असं कनाल यांनी पक्षप्रवेशावेळी सांगितले. 

तसेच सगळ्यांना वाटतं की, तो दिशा सालियन किंवा सुशांत सिंग राजपूत प्रकरणामुळे तिकडं गेला असावा. पण हा आरोप अनेकवेळा केला जात होता आणि आजही करत आहेत. परंतु, कृपया याची चौकशी करा यात मी दोषी आढळलो तर तुम्ही सांगाल तिथे मी जायला तयार आहे, असेही कनाल यांनी शिंदेंसमोर मांडले. 

राहुलचे शिवसेनेत स्वागत - एकनाथ शिंदे
राहुल कुणाल यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, "राहुल कणालचे मी शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो आणि त्याला मनापासून शुभेच्छा देतो. तो युवासेनेच्या संघटनेचे चांगले काम करत आहे, त्याच्यासोबच आलेल्या कार्यकर्त्यांचेही स्वागत करतो. शिवसेना-भाजपा युतीचं सरकार स्थापन झालं त्याला काल एक वर्ष झालं. मागील वर्षभरात सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. महाविकास आघाडीमुळे राज्याचे नुकसान झाले. कोविड काळात सगळे घरात थांबायचे पण ज्याच्यात हिम्मत होती तो बाहेर यायचा त्यात राहुलचाही समावेश होता." 

 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title:  Shiv Sena Uddhav Balasaheb party leader Aditya Thackeray's close aide Rahul Kanal has joined Shiv Sena in the presence of Eknath Shinde 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.