Join us

Maharashtra Politics: ठाकरेंनी गजानन कीर्तिकरांना पर्याय शोधला! ‘या’ खासदाराची वर्णी; महत्त्वाच्या पदावर नियुक्ती  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 3:33 PM

Maharashtra News: गजानन कीर्तिकरांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्या मर्जीतील खास व्यक्तीची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknth Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यापासून पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) पक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटात प्रवेश केला असून, उद्धव ठाकरेंनी लगेचच आपल्या विश्वासू व्यक्तीची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर कीर्तिकरांकडे असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपद कोणाकडे सोपवले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार अनिल देसाई यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सचिव पदावरुन नेतेपदावर बढती व्हावी अशी इच्छा

अनिल देसाई सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. सचिव पदावरुन नेतेपदावर बढती व्हावी, अशी त्यांची इच्छा असल्याची चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदासोबत शिवसेना नेतेपदही त्यांना मिळणार का, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदासाठी अनिल देसाई यांचे नाव आघाडीवर होते. यापूर्वीही स्थानिय लोकाधिकार समितीचे सरचिटणीसपद देसाई यांच्याकडे होते. अनेक वर्षांपासून ते स्थानिय लोकाधिकार समितीत काम करत आहेत. तसेच ते ठाकरे कुटुंबाच्या मर्जीतील आहेत. त्यामुळे हे पद देसाई यांनाच मिळणार असल्याचे बोलले जात होते.  त्यानुसार उद्धव ठाकरेंनी त्यांची निवड केली.

दरम्यान, गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटानेही त्यांची पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी केली होती. ते पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही होते. कीर्तिकरांच्या गच्छंतीनंतर शिवसेना नेतेपद आणि लोकाधिकार समितीचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी सहा नेत्यांमध्ये चढाओढ सुरु असल्याचे बोलले जात होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :उद्धव ठाकरेगजानन कीर्तीकरशिवसेना