मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी–गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी यादरम्यान केलं. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांकडून टीका होत आहे. दरम्यान, यावर उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांवर जोरदार हल्लाबोल केला.
“आज महाराष्ट्रात राहून, सर्वकाही ओरपलं आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाचा अपमान केला आहे. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आहे. महाराष्ट्रात अनेक गोष्टी आहेत. कोल्हापूरचं वहाण त्यांना दाखवायची गरज आहे. ते महाराष्ट्राचं वैभव आहे. त्याचा अर्थ कोणी कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात साधी माणसं काय कष्टानं वर येतात हे सांगण्यासाठी मी त्याचा वापर केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. हे अनावधानानं आलेलं विधान नाही. काही ठिकाणी राज्यपाल तत्परतेनं हलताना दिसतात, काही ठिकाणी ते अजगरासारखे सुस्त बसलेले दिसतात असं म्हणत त्यांनी टीकाही केली.महाराष्ट्राची ओळख, मराठी माणसाची ओळख संपूर्ण जगाला आहे. परंतु राज्यपालांना नाही याची खंत आहे. आज मराठी माणसं तर चिडलेली आहेतच. ही मुंबई आहे ती कोश्यारींनी मराठी माणसाला आंदण दिलेली मुंबई नाही. संयुक्त महराष्ट्राच्या लढ्यात रक्त सांडून मुंबई हक्कानं मिळवली आहे. १०५ हुतात्मे त्यासाठी झाले आहेत. राष्ट्रपतींचे हे दूत असताता. घटनेची शपथ घेताना जात पात धर्मापलिकडे जाऊन सांभाळ करणं आणि वागणूक देणं सर्वांचं कर्तव्य आहे. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला आहे. त्यांनी हिंदुंमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
सरकारनं भूमिका घ्यावीकोश्यारींना घरी पाठवायचं की तुरुंगात हे ठरवावं लागेल. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम त्यांनी केलं आहे. महाराष्ट्राचं मीठ गेली तीन वर्षं खाताय, त्या मिठाशी नमक हरामी केलीये. नवहिंदुत्ववादी आहेत, कडवे हिंदू असतील मोडधारी सत्ताधारी हिंदूंना, त्यांच्या मते आम्ही हिंदुत्व सोडलंय. ते हिंदू सुद्धा असतील आणि मराठी सुद्धा असतील त्या सरकारने राज्यपालांबद्दल सरकारने भूमिका घ्यायला पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.