Join us

मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी; मुख्यमंत्र्यांचा पोलिसांवर विश्वास नाही? भाजपचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 9:28 AM

Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree : राणा दाम्पत्याने दिलेला इशारा आणि मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी केलेली गर्दी यावरून भाजपने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई:  हनुमान चालीसा पठणावरून सुरू झालेल्या वादात खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी उडी घेतली असून, आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीस पठण करण्याचे आव्हान दिले आहे. दुसरीकडे शिवसैनिक सुद्धा राणा दाम्पत्यांविरोधात आक्रमक झालेले आहेत. कालपासूनच पोलिसांबरोबरच शिवसैनिकही मातोश्री बाहेर पहारा देत आहेत. 

दरम्यान, राणा दाम्पत्याने दिलेला इशारा आणि मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी केलेली गर्दी यावरून भाजपने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे राज्याचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. "राज्यात कायदा सुव्यवस्थेचे उघडपणे धिंडवडे निघतायेत. ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांची पोलिसांच्या उपस्थितीतच दादागिरी चालू आहे. राणा दाम्पत्याला विरोध करण्यासाठी शिवसेनेचे खासदार आमदार नेतेमंडळी शिवसैनिक मातोश्रीवर जमले आहे."

"राज्यातील गृहखात्यावर, पोलिसांवर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास नाही का? असं असेल तर तात्काळ गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी त्यांच्या खुर्चीवरून पायउतार व्हावं? भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर भ्याड हल्ला झाला, तो दहशत निर्माण करण्यासाठी होता. या अशा हल्ल्यांना भाजपा घाबरत नाही," असेही केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. 

मातोश्रीबाहेर मोठ्या संख्येने जमले शिवसैनिक राणा दाम्पत्यांनी शिवसेनेला दिलेल्या आव्हानानंतर मातोश्रीबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काल शिवसैनिकांची भेट घेतली. यानंतर रात्रभर शिवसैनिकांचा मातोश्रीवरील ओघ सुरूच होता. मध्यरात्रीपासूनच शिवसैनिकांची मातोश्रीबाहेर गर्दी जमा झाल्याचे सांगितले जात आहे.

राणांच्या घराबाहेर मध्यरात्री शिवसैनिकांची घोषणाबाजीमातोश्री बाहेर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. शुक्रवारी दिवसभर रवी राणा यांच्या मुंबईतील खार येथील निवासस्थानी हाय व्होल्टेज ड्रामा झाल्यानंतर मध्यरात्री शिवसैनिकांनी राणांच्या घराबाहेर घोषणाबाजी केली. तसेच, शनिवारी सकाळपासूनच याठिकाणी शिवसैनिक जमा झाले असून, ती गर्दी वाढत चालल्याचे दिसत आहे.

टॅग्स :रवी राणाउद्धव ठाकरेभाजपा