LIVE: जामीन घेण्यास राणा दाम्पत्याचा नकार; दोघांची आजची रात्र तुरुंगात

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 08:26 AM2022-04-23T08:26:34+5:302022-04-23T20:42:25+5:30

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त केल्यापासून ...

Shiv Sena vs. Navneet Rana Ravi Rana over Hanuman Chalisa at Uddhav Thackeray residence Matoshree Live Updates | LIVE: जामीन घेण्यास राणा दाम्पत्याचा नकार; दोघांची आजची रात्र तुरुंगात

LIVE: जामीन घेण्यास राणा दाम्पत्याचा नकार; दोघांची आजची रात्र तुरुंगात

googlenewsNext

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त केल्यापासून शिवसैनिकांनीही जोरदार तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. आता सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन राणा दाम्पत्याने स्पष्ट केले. त्यावरून शिवसैनिक संतप्त झाले आहेत. यानंतर लगेचच शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर जमण्यास सुरुवात केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी येथील शिवसैनिकांची भेट घेतली. तर, तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनीही मध्यरात्री शिवसैनिकांशी संवाद साधल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आंदोलन मागे घेतल्याची घोषणा

आता, राणा दाम्पत्याने आंदोलन माघार घेतल्याची घोषणा केली आहे. आमच्या घरावर हल्ला केला, तोडफोड केली. आता आम्ही आमचे आंदोलन माघारी घेत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून हे आंदोलन आम्ही मागे घेत आहोत, अशी घोषणा आमदार रवि राणा यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या 24 एप्रिल रोजी मुंबई दौरा आहे. मोदी हे देशाचं वैभव आहेत, त्यामुळे या दौऱ्याला गालबोट लागू नये, म्हणून हे आंदोलन संपवत असल्याचं रवि राणा यांनी म्हटलं. 

LIVE

Get Latest Updates

07:45 PM

राणा दाम्पत्याचा जामीन घेण्यास नकार

थोड्याच वेळात नवनीत राणा आणि रवी राणांची वैद्यकीय चाचणी होणार

07:15 PM

भाजप नेते किरीट सोमय्या आज रात्री साडे नऊ वाजता खार पोलीस ठाण्यात जाणार

अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याच्या भेटीसाठी सोमय्या पोलीस ठाण्यात जाणार

06:31 PM

राणा दाम्पत्याकडून उद्धव ठाकरे, संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, मंत्री अनिल परब आणि शिवसेनेच्या ५०० कार्यकर्त्यांविरोधात तक्रार केली दाखल केली आहे. आम्ही केवळ हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मातोश्रीबाहेर जाणार होतो. मात्र राजकीय सूडाच्या भावनेनं शिवसेना नेत्यांनी आमच्यावर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिल्याची तक्रार राणा दाम्पत्यानं नोंदवली आहे.

06:30 PM

खार पोलिसांकडून राणा दाम्पत्याला अटक; कलम १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल

खार पोलिसांकडून अटकेची कारवाई; राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट पोलीस ठाण्यात पोहोचले

05:49 PM

जुलमी राजवटीप्रमाणे मविआ सरकारचं काम- भाजप नेते प्रविण दरेकर

असाच कारभार सुरू राहिला तर राज्यात अराजक माजेल; महाराष्ट्राची वाटचाल पश्चिम बंगालच्या दिशेनं सुरू- प्रविण दरेकर

05:45 PM

राणा दाम्पत्याला घरातून सुरक्षित बाहेर काढण्यात पोलिसांना यश

राणा दाम्पत्याला पोलिसांनी सुरक्षित पोलीस ठाण्यात नेलं; शिवसैनिकांची घोषणाबाजी

05:35 PM

राणा दाम्पत्य घराबाहेर पडले; शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी

राणा दाम्पत्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पोलिसांच्या दोन गाड्या इमारतीच्या आत; इमारतीबाहेर असलेल्या शिवसैनिकांची घोषणाबाजी

04:50 PM

शिवसैनिकांनी संयम राखावा - उद्धव ठाकरे

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे राणा दाम्पत्याच्या घडामोडींवर आदेश आले आहेत. शिवसैनिकांनी संयम ठेवावा, कोणीही कायदा व सुव्यवस्था हाती घेऊ नये, असे आदेश दिले आहेत. तर पोलिसांनी मोठी कुमक बोलावली असून राणा दांम्पत्याला बाहेर काढण्यासाठी देखील वाहने दाखल झाली आहेत. पोलिसांनी गर्दी कमी करण्यास सांगितले आहे. 

03:49 PM

यापुढे नादाला लागाल तर.. - संजय राऊत

पुन्हा अमरावतीतून लोकसभेत जाऊन दाखवा. यापुढे कोणी शिवसेनेच्या नादाला लागलं तर त्याने आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून याव्यात. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका, अन्यथा 20 फूट खाली गाडले जाल, अशी धमकीच खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यास दिली आहे. स्वतःमध्ये लढायची ताकद नाही म्हणून या अशा शिखंडीना पुढे केले जात आहे. महाभारतातील शिखंडी ला लाजवणारे राजकारण सीबीआय व ईडीच्या भरोशावर सुरू आहे. आमच्या मनगटात बाळासाहेबांनी माज भरला आहे तो असाच कायम राहील, असे म्हणत राऊत यांनी आक्रमक भूमिका मांडली.

02:55 PM

राणा दाम्पत्याने घेतली माघार

आमच्या घरावर हल्ला केला, तोडफोड केली. आता आम्ही आमचे आंदोलन माघारी घेत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून हे आंदोलन आम्ही मागे घेत आहोत, अशी घोषणा आमदार रवि राणा यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या 24 एप्रिल रोजी मुंबई दौरा आहे. मोदी हे देशाचं वैभव आहेत, त्यामुळे या दौऱ्याला गालबोट लागू नये, म्हणून हे आंदोलन संपवत असल्याचं रवि राणा यांनी म्हटलं. 
 

02:40 PM

सुप्रिया सुळेंनीही दिली प्रतिक्रिया

दिल्लीतील नवनीत राणांच्या कार्यपद्धतीविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नवनीत राणा दिल्लीत खूप सक्रीय आहेत. खूप वेळा भाषण करतात. माझ्या दिल्लीतल्या सहकारी आहेत. 

02:04 PM

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न - गृहमंत्री

01:29 PM

कोल्हापुरी मिरचीनं स्वागत करू

01:29 PM

राणा दाम्पत्य हे पुढे करण्यात आलेलं प्याद - गृहमंत्री

राणा दाम्पत्य हे पुढे करण्यात आलेलं प्याद; राज्याची प्रतिमा मलीन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

01:28 PM

भाजपच्या आशिष शेलार यांचा सवाल

12:34 PM

नितीन नांदगावकर आणि प्रियंका चतुर्वेदीही रस्त्यावर

12:00 PM

राणा दाम्पत्याची आज माघार

11:24 AM

राष्ट्रपती राजवट लागू करा, संजय राऊत यांचं भाजपला चॅलेंज

11:23 AM

राणा दाम्पत्याच्या पाठिशी भाजप नेते - राऊत

10:32 AM

बायकांच्या आडून भाजपचा शिकंडीचा खेळ - राऊत

बायकांना पुढे करुन शिकंड्याचा खेळ भाजपा करतंय, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, राणा दाम्पत्याने लायकीत राहावे, असे म्हणत तुम्ही आमच्या घरात शिरताय, मग शिवसैनिक कसा गप्प बसेल. शिवसैनिकांचा हा उत्स्फुर्त प्रतिसाद आहे, असेही राऊत यांनी म्हटले. 
 

10:15 AM

काय म्हणाले आमदार रवि राणा

10:07 AM

शिवसैनिक आक्रमक, राणांच्या घराबाहेर तणाव

10:06 AM

हे गृहमंत्र्याचं अपयश, याउलट आमच्या हनुमान चालिसा पठणास नौटंकी म्हणतात - राणा

आमच्या हनुमान चालिसा पठण करण्यास गृहमंत्री नौटंकी म्हणतात. मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले गुंडे आमच्या घरावर हल्ला करतात, हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे, राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. आमच्या घरावरील हल्ल्याचंही गृहमंत्री समर्थन करत आहेत. मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना ढिल दिली जात आहे, पोलिसांवर दबाव टाकला जात आहे, असा गंभीर आरोप आमदार रवि राणा यांनी केला आहे.  

09:52 AM

घराबाहेर येऊन दाखवा, आम्ही वाट पाहतोय - सरदेसाई

बाकी सगळे विषय गौण आहेत, ज्यांनी मातोश्रीला वारंवार आव्हान दिलंय. आज 23 तारीख आलीय, त्यांनी घराबाहेर येऊन दाखवावं, आम्ही त्यांचीच वाट पाहतोय. उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांचे दैवत आहेत हे त्यांना माहिती होतं. मग, आता का शिवसैनिक घरात घुसूत असल्याचं सांगताय, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटलंय. 

09:39 AM

राणा दाम्पत्याने नौंटकी बंद करावी - गृहमंत्री

मी पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याची सूचना दिली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी माझ्या संपर्कात आहेत. राणांनी घरातच हनुमान चालिसा घरातच पठण करावी. राणा दाम्पत्याच्या पाठिमागे कोणीतरी छुपे आहेत, कोणीतरी त्यांना सुपारी दिली आहे. याचा शोध घेतला जाईल. पण, राणा दाम्पत्याने नौटंकी बंद करावी, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले.   

09:28 AM

आम्ही मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणारच - राणा

आम्हाला पोलिसांनी थांबवले आहे, त्यामुळे आम्ही अद्यापच घरातच आहोत. मात्र, आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणारच, अशी भूमिका रवि राणा यांनी बोलून दाखवली. मातोश्री हे आमच्यासाठीही मंदिर आहे, आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे पाईक आहोत. आताची शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची उरली नाही. मुख्यमंत्र्यांनीच शिवसैनिकांना आमच्या घराकडे पाठवल्याच गंभीर आरोपही रवि राणा यांनी केला आहे. 

09:15 AM

माफी मागा नाहीतर घरात घुसू, शिवसैनिक आक्रमक

शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून राणा दाम्पत्याला थेट इशारा दिला आहे. तुम्ही घराबाहेर येऊन दाखवा आणि महाप्रसाद सोबतच आणला आहे. जोपर्यंत राणा दाम्पत्य माफी मागत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. माफी मागा अन्यथा घरात घुसू असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. 

09:13 AM

महिला शिवसैनिकांचीही मातोश्रीबाहेर मोठी गर्दी

मातोश्रीबाहेर शिवसैनिकांच्या रवी राणा नवनीत राणा यांच्या विरोधात बंटी बाबलीच्या घोषणा देण्यात येत आहेत. महिला शिवसैनिकांचीही मोठी गर्दी याठिकाणी जमली असून राणा दाम्पत्यांविरुद्ध शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

09:04 AM

राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक

शिवसैनिका राणा दाम्पत्याच्या खार येथील घराबाहेर मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. शिवसैनिकांनी बॅरीकेट्स तोडून राणा दाम्पत्याच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला असून आता 9 ची वेळ संपली असल्याचं शिवसैनिकांनी म्हटलं. आता, आमची वेळ सुरू झालीय, असा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे.  

08:49 AM

हिंमत असेल तर येऊन दाखवा

शिवसैनिकांनी पहाटेपासूनच मातोश्रीबाहेर जमण्यास सुरुवात केली. मातोश्रीबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. यातच आता हिंमत असेल तर येऊन दाखवा, शिवसैनिक सज्ज आहेत, असे बॅनर मातोश्रीसमोर झळकले असून, शिवसेनेने शक्तिप्रदर्शनास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. 

08:36 AM

तेजस ठाकरेंकडून जेवण-पाण्याची विचारपूस

रात्रभर शिवसैनिकांचा मातोश्रीवरील ओघ सुरूच होता. मध्यरात्रीपासूनच शिवसैनिकांची मातोश्रीबाहेर गर्दी जमा झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी मध्यरात्री मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधल्याचे सांगितले जात आहे. यावेळी जेवणाची आणि पाण्याची तेजस ठाकरे यांनी विचारपूस केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

 

Web Title: Shiv Sena vs. Navneet Rana Ravi Rana over Hanuman Chalisa at Uddhav Thackeray residence Matoshree Live Updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.