'दुश्मनी करो, तो जमके करो; शिवसेनेचा भाजपाला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 11:10 PM2022-02-11T23:10:37+5:302022-02-11T23:10:56+5:30

सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पावर शुक्रवारी स्थायी समिती अध्यक्षांनी प्रास्ताविक भाषण केले. जकातीच्या नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने ११ हजार ४२९ कोटी ७३ लाख रुपये दिल्याचे त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला स्पष्ट केले.

shiv Sena warns BJP on Enmity before mumbai municipal Election | 'दुश्मनी करो, तो जमके करो; शिवसेनेचा भाजपाला इशारा 

'दुश्मनी करो, तो जमके करो; शिवसेनेचा भाजपाला इशारा 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई - पालिका निवडणुका तोंडावर असल्याने शिवसेना - भाजपमधील दररोज आरोप- प्रत्यारोपांच्या फेऱ्या रंगत आहेत. मात्र शुक्रवारी महापालिकेच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपवर शायरीमार्फत निशाणा साधला. मुंबई जगात पुढे असावी यासाठी शिवसेना नेहमीच प्रयत्नशील असते. मात्र काही राजकीय पक्षांचे मित्र खोटे आरोप करून दिशाभूल करीत आहेत. माहिती न घेता टीका केली जाते, असा टोला लगावत, 'दुश्मनी करो, तो जमके करो, पर ये खयाल रहे के कल अगर दोस्त भी बने तो शर्मिंदगी न हो, असा टोला त्यांनी भाजप सदस्यांना लगावला. 

सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पावर शुक्रवारी स्थायी समिती अध्यक्षांनी प्रास्ताविक भाषण केले. जकातीच्या नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने ११ हजार ४२९ कोटी ७३ लाख रुपये दिल्याचे त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला स्पष्ट केले. तसेच हे अनुदान पालिकेला यापुढेही मिळणार का? याबाबत आयुक्तांनी खुलासा का केला नाही? असा सवाल त्यांनी केला. तसेच आयुक्त नगरसेवकांना भेटत नाहीत, त्यांना बसवून ठेवले जाते. आयुक्तांसोबत विकासाच्या कामांबाबत नगरसेवकांना चर्चा करायची असते. पण भेट दिली जात नसल्याने सर्वसामान्य नगरसेवकांच्या प्रभागातील कामे होत नाहीत. नगरसेवक आयुक्तांच्या विरोधात बोलले तर, त्यांची कामे थांबवली जातात. विरोधकही चांगले काम करूनही कधीच शाबासकी देत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

वांद्र्यात डबेवाला भवन.... 

विद्यमान अर्थसंकल्पात डबेवाला भवन उभारण्याची तरतूद करण्यात आली होती. यंदाचा अर्थसंकल्प मांडताना विरोधकांनी यावर टीकास्त्र सोडले होते. मात्र डबेवाल्यांसाठी वांद्रे येथे २८६.२७ चौरस मीटर जागेत भवन बांधून देण्यात येईल, असे जाधव यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: shiv Sena warns BJP on Enmity before mumbai municipal Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.