Join us

मुंबई महापालिकेचा कारभार शिवसेनेच्या हातात राहणार नाही, राणेंचा थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 12:52 PM

मी जिथं उभा आहे, तिथून बाजूलाच कलानगर आहे. त्यामुळे, काही गोष्टी त्यांच्या कानावर जायलाच पाहिज्यात, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. महाराष्ट्राच्या इंच इंच जमिनीवर महाराष्ट्राच्या जनतेचा अधिकार आहे.

ठळक मुद्देविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या जनआशीर्वाद यात्रेत सहभागी झाले आहेत. 

मुंबई - केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज मुंबईतून सुरुवात झाली आहे. नारायण राणे मुंबई विमानतळावर येताच मोठी गर्दी त्यांना घ्यायला जमा झाली होती. त्यानंतर, या जनआशीर्वाद यात्रेतही मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमा झाले आहेत. राणेंनी मातोश्रीच्या बाजूलाच असलेल्या येथून यात्रेतील आपलं पहिलं स्वागतपर भाषण केलं. त्यावेळी, आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेनेवरही प्रहार केला. 

मी जिथं उभा आहे, तिथून बाजूलाच कलानगर आहे. त्यामुळे, काही गोष्टी त्यांच्या कानावर जायलाच पाहिज्यात, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. महाराष्ट्राच्या इंच इंच जमिनीवर महाराष्ट्राच्या जनतेचा अधिकार आहे. त्यामुळे, कुणीही विनाकारण आपल्याला झेपणार नाहीत, अशा गोष्टी बोलू नयेत. अन्यथा येणाऱ्या महापालिकेत गेल्या 2 वर्षात तुम्ही येथील जनतेला कसं पाठीमागे टाकंल, याचा उद्धार होणारच आहे. पण, येथील जनता तुमच्या कारभाराला कंटाळली आहे. त्यामुळे, मुंबई महापालिकेचा कारभार तुमच्या हातात राहणार नाही, असे राणेंनी म्हटले. महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रीपद दिलं, त्यामुळे मला आपली सोबत हवीय, असेही नारायण राणेंनी म्हटलं. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या जनआशीर्वाद यात्रेत सहभागी झाले आहेत. 

मुंबई महापालिकेची मोर्चेबांधणी

मुंबई महापालिकांच्या आगामी निवडणुकांविषयी गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यातच केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या महाराष्ट्रातील चार नेत्यांनी राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. नव्या मंत्र्यांनी जनतेशी संवाद साधावा, यासाठी ही यात्रा काढल्याचे सांगितले जात असले, तरी या माध्यमातून भाजपने महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याची चर्चा आहे. त्यातच, केंद्रीयमंत्री नारायण राणे आपल्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात केली आहे. आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी मुंबई महापालिकेचा मुद्दा उपस्थित केला आहे.  

टॅग्स :नारायण राणे शिवसेनादेवेंद्र फडणवीसमुंबई महानगरपालिकामुंबई