मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावाच्या मतदानावेळी शिवसेना तटस्थ राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 11:32 AM2018-03-16T11:32:34+5:302018-03-16T11:58:41+5:30

भाजपाला उठसूट इशारे देणाऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा मोक्याच्या क्षणी कच खाल्ल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Shiv Sena will remain neutral while presenting No Confidence motion in Lok Sabha | मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावाच्या मतदानावेळी शिवसेना तटस्थ राहणार

मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावाच्या मतदानावेळी शिवसेना तटस्थ राहणार

Next

मुंबई: एरवी केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेच्या बोटचेप्या वृत्तीचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. वायएसआर काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर लोकसभेत मतदान झाल्यास आम्ही तटस्थ राहू, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याचे समजते. त्यामुळे भाजपाला उठसूट इशारे देणाऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा मोक्याच्या क्षणी कच खाल्ल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

वायएसआर काँग्रेसकडून शुक्रवारी मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षानेही आज सकाळी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लोकसभेत सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष शिवसेनेच्या भूमिकेकडे लागले होते. 

वायएसआर काँग्रेसकडून शुक्रवारी मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षानेही आज सकाळी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लोकसभेत सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष शिवसेनेच्या भूमिकेकडे लागले होते. परंतु, काही वेळापूर्वीच शिवसेनेतील नेत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर याबद्दलची माहिती दिली. तेलुगू देसमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, आम्ही मतदानाच्यावेळी तटस्थ राहू, असे या नेत्यांनी सांगितले. 

टीडीपीचे सर्वेसर्वा आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. त्यात केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वसंमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. आंध्रप्रदेशला विशेष दर्जा मिळावा अशी मागणी तेलुगू देसमने केली असून, ती मान्य होत नसल्याने गेल्याच आठवड्यात तेलुगू देसमच्या दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यावेळी तेलुगू देसमने एनडीएतच राहण्याची भूमिका घेतली होती. मात्र तरीही मागणी मान्य होत नसल्याने नायडू हे एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली जात होती. त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 

Web Title: Shiv Sena will remain neutral while presenting No Confidence motion in Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.