पीडितेच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी शासन, शिवसेना स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:09 AM2021-09-12T04:09:13+5:302021-09-12T04:09:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : साकीनाका येथे झालेल्या अमानुष बलात्कार प्रकरणातील मृत पीडितेच्या कुटुंबीयांचे जे. जे. रुग्णालयात जाऊन ...

Shiv Sena will take responsibility for the education of the victim's daughters | पीडितेच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी शासन, शिवसेना स्वीकारणार

पीडितेच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी शासन, शिवसेना स्वीकारणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : साकीनाका येथे झालेल्या अमानुष बलात्कार प्रकरणातील मृत पीडितेच्या कुटुंबीयांचे जे. जे. रुग्णालयात जाऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सांत्वन केले. पीडितेच्या महिलेच्या दोन्ही मुलींच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी शासन आणि शिवसेना स्वीकारीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेतील महिलेसोबत घडलेली घटना संतापजनक आणि निंदनीय असून, या प्रकरणातील प्रमुख आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

या पीडित महिलेच्या कुटुंबाची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली असून, स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्या माध्यमातून त्यांना लागेल ती मदत पोहोचविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

--------

‘शक्ती’ कायदा हिवाळी अधिवेशनात येणार

महिलांवरील अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या ‘शक्ती’ कायद्याचा मसुदा विधिमंडळाच्या कायदाविषयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आला असून, येत्या हिवाळी अधिवेशनात ही समिती आपला अहवाल तयार करून विधानसभेच्या पटलावर ठेवील. त्यानंतर या कायद्याबाबत पुढील निर्णय होईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Shiv Sena will take responsibility for the education of the victim's daughters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.