मुंबई : महापालिकेतील विशेष समित्यांपैकी असलेल्या सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षपदी प्रविणा मोरजकर तसेच बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षपदी चंद्र्रावती मोरे यांची गुरुवारी निवड झाली. भाजप उमेदवारांचा पराभव करीत शिवसेनेच्या उमेदवारांनी या दोन्ही विशेष समित्यांचे अध्यक्षपद खेचून आणले.आरोग्य समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रविणा मोरजकर १८ मते मिळवून विजयी झाल्या. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपच्या बीना दोशी यांना १२ मते मिळाली. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे वसंत नकाशे हे १८ मते मिळवून विजयी झाले. तर भाजपच्या अनिता पांचाळ यांना १२ मते मिळाली. एकूण ३५ सदस्यांपैकी ३० सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. दोन सदस्य अनुपस्थित होते, तीन सदस्य तटस्थ राहिले.बाजार व उद्यान समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रावती मोरे या १६ मते मिळवून विजयी झाल्या. भाजपच्या स्वप्ना म्हात्रे यांना १२ मते मिळाली. या निवडणुकीत एक मत अवैध ठरले. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तुकाराम (सुरेश) पाटील हे १५ मते मिळवून विजयी झाले.तर भाजपचे पंकज यादव यांना १३ मते मिळाली. या निवडणुकीत १ मत अवैध ठरले. एकूण ३६ सदस्यांपैकी २९ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. चार सदस्य अनुपस्थित होते, तर तीन सदस्य तटस्थ राहिले.आरोग्य समिती अध्यक्षपद निवडणुकीत शिवसेनेच्या प्रविणा मोरजकर १८ मते मिळवून विजयी झाल्या. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपच्या बीना दोशी यांना १२ मते मिळाली. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे वसंत नकाशे हे १८ मते मिळवून विजयी झाले. तर भाजपच्या अनिता पांचाळ यांना १२ मते मिळाली.
आरोग्य प्रविणा मोरजकर यांच्याकडे उद्यानाची धुरा चंद्रावती मोरेंच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 2:11 AM