'शिवबंधन' सोडून शिवसैनिक झाले 'महाराष्ट्र सैनिक; राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 06:42 PM2020-08-31T18:42:11+5:302020-08-31T18:42:57+5:30

राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

Shiv Sena workers from Aurangabad have joined MNS today | 'शिवबंधन' सोडून शिवसैनिक झाले 'महाराष्ट्र सैनिक; राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश

'शिवबंधन' सोडून शिवसैनिक झाले 'महाराष्ट्र सैनिक; राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश

googlenewsNext

मुंबई: मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. याचदरम्यान आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत औरंगाबादेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला शिवसेनेने धक्का दिल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे औरंगाबादेतील पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देखील आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केला असल्याचे मनसेने सांगितले.

"काय चाललंय; इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर आपलं चंबू गबाळ आवरुन आपल्या राज्यात जावं"

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सिडको हडको भागात प्राबल्य असणारे राजू खरे, भाजपाचे माजी नगरसेवक नामदेव बेंद्रे,शिवसेना माजी उपशहर प्रमुख व पतित पावन संघटनेचे अध्यक्ष पै.प्रविण कडपें, जिल्हा संघटक अंकुश क्षीरसागर, कार्याध्यक्ष राजू परळीकर व शिवसेनेचे प्रशांत जोशी,रमेश मोदाणी, अरविंद जाधव यांच्यासह अनेकांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे, अशी माहिती औरंगबादचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी दिली.

दरम्यान, देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता गेल्या तीन महिन्यांआधीच राज्यातील महापालिकेच्या निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोरनाचा प्रादुर्भाव कमी होताच महापालिकेच्या निवडणूका घेतल्या जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या- 

गुंगीचं औषध देऊन १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; वेश्याव्यवसायातही ढकलल्याची घटना

"सचिन सावंत तुम्ही नगरसेवक म्हणून फक्त एकदा निवडून या अन् उभं राहायचं धाडस दाखवा"

आदित्य टी कोण हे रियाला माहीत नाही, पण त्यांची इन्स्टा पोस्ट तिने लाईक केलीय; नितेश राणेंचा बाण

Web Title: Shiv Sena workers from Aurangabad have joined MNS today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.