वर्सोव्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची वादळातही जनतेच्या मदतीसाठी तप्तरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:06 AM2021-05-19T04:06:27+5:302021-05-19T04:06:27+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर साेमवारी घोंगावणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाने अनेक ठिकाणी माेठे नुकसान केले. प्रभाग क्र. ५९ ...

Shiv Sena workers in Versova ready to help the people even in storms | वर्सोव्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची वादळातही जनतेच्या मदतीसाठी तप्तरता

वर्सोव्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची वादळातही जनतेच्या मदतीसाठी तप्तरता

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर साेमवारी घोंगावणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाने अनेक ठिकाणी माेठे नुकसान केले. प्रभाग क्र. ५९ वर्सोवा येथे समुद्राने रौद्ररूप धारण केले हाेते. ते पाहून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वादळातही जनतेच्या मदतीसाठी तप्तरता दाखवली.

शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका व बाजार उद्यान समिती अध्यक्षा प्रतिमा खोपडे, शाखाप्रमुख सतीश परब यांच्यासह किनाऱ्यालगत असलेल्या नागरिकांशी प्रत्यक्ष तसेच शक्य नसेल तेथे फोनवरून चौकशी करत होते. दरम्यान, या प्रभागात प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी उपविभागप्रमुख राजेश शेट्ये यांच्यासह शाखाप्रमुख सतीश परब, उपशाखाप्रमुख राजेश रासम, राजेश पुरंदरे, ज्ञानेश्वर कारंडे, आश्विनी पाटील, मंजू आंग्रे आदींना घेऊन त्या वर्सोवा बंदरावर आल्या. येथे सुमारे १५० प्रवासी बंदरावर मढ येथे जाण्यासाठी बोट सेवा उपलब्ध नसल्याने अडकून पडले होते. ते बघताच त्यांना कोळी समाजाच्या हॉलमध्ये बसण्याची व्यवस्था करून चहापानाच्या सोयीसह प्रतिमा खोपडे यांनी महापालिकेच्यावतीने भोजनाचीही व्यवस्था करून दिली. तसेच सात बंगला सागर कुटीर येथील १५ कुटुंबांतील सदस्यांचीही भोजन व्यवस्था केली.

----------------------- - - - - - --

Web Title: Shiv Sena workers in Versova ready to help the people even in storms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.