'शिवसेनेच्या 4 उमेदवारांना मिळून फक्त 971 मतं, सर्वांचेच डिपॉझिट जप्त'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 04:42 PM2020-02-12T16:42:51+5:302020-02-12T16:44:03+5:30

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2015 च्या निवडणुकांसारखाच यंदाही

'Shiv Sena's 4 candidates get 971 votes, all deposits confiscated' | 'शिवसेनेच्या 4 उमेदवारांना मिळून फक्त 971 मतं, सर्वांचेच डिपॉझिट जप्त'

'शिवसेनेच्या 4 उमेदवारांना मिळून फक्त 971 मतं, सर्वांचेच डिपॉझिट जप्त'

Next

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2020मध्ये पुन्हा एकदा मोठा विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतल्या रामलीला मैदानात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केजरीवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्वच विरोधी पक्षांचा धुव्वा उडवला आहे. त्यामध्ये भाजपा, काँग्रेसह, राष्ट्रवादीसह शिवसेनेचाही समावेश आहे.  

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2015 च्या निवडणुकांसारखाच यंदाही आपने मोठा विजय मिळवला. आपने 62 जागांवर विजय मिळवलेला असून, गत निवडणुकीच्या तुलनेत 5 जागा कमी झालेल्या आहेत. भाजपाला या निवडणुकीत 8 जागाच राखता आल्या. तर काँग्रेसच्या 67 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनंही दिल्ली विधानसभेत उमेदवार उतरवले होते. मात्र, दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. शिवसेनेच्या 5 उमेदवारांच्या मतांची बेरीज 19,015 एवढी आहे. त्यापैकी, चार उमेदवारांना मिळून फक्त 971 मते मिळाली आहेत. तर एका उमेदवाराने 18 हजार 44 मते घेतली. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुराडी मतदारसंघातून शिवसेनेकडून धरम वीर हे उमेदवार होते. केवळ यांनाच काही प्रमाणात लोकांनी पसंती दिल्याचं दिसून येतंय. धरम वीर यांना 18 हजार 44 मते मिळाली आहेत. मात्र, तरीही त्यांचं डिपॉझिट जप्त झालंय. करोल बाग मतदारसंघातून गौरव यांना 192 मतेच मिळाली. चांदणी चौक मतदारसंघात अनिल सिंग जादोन या शिवसेना उमेदवारास फक्त 242 मतं मिळाली. विकासपुरी मतदारसंघातून संजय गुप्ता यांना 422 मतं मिळाली आहेत. तर, मालबिया नगर येथील मोबिन अली यांना 115 मते मिळाली. त्यामुळे, शिवसेनेच्या 5 पाचही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून त्यापैकी तीन उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मते आहेत.  

दरम्यान, शिवसेनेनं आजच्या अग्रलेखातून भाजपावर मोठी टीका केली आहे. मात्र, त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही याचं जराही शल्य शिवसेनेला वाटलं नाही. 

Web Title: 'Shiv Sena's 4 candidates get 971 votes, all deposits confiscated'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.