गिरगावात शिवसेनेचं मेट्रो, डीबी रिअॅलिटीविरोधात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 02:28 PM2019-11-18T14:28:34+5:302019-11-18T14:30:03+5:30
असंतोषामुळे आंदोलन करत गाड्यांची तोडफोड केली आहे.
मुंबई - वाहतुकीच्या समस्येला कंटाळून मेट्रो ३ विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून सेना कार्यकर्त्यांकडून गिरगावात गाड्यांची तोडफोड केली जात आहे.गिरगावात सुरू असणाऱ्या मेट्रो ३ च्या विरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना आक्रमक होती. मात्र, आज त्यांच्या असंतोषामुळे आंदोलन करत गाड्यांची तोडफोड केली आहे.
गिरगावात चिंचोळ्या हल्ली आणि त्यातच मेट्रोचं सुरु असलेलं काम यामुळे तेथील नागरिकांना वाहतुकीच्या नाहक त्रासाला नेहमी सामोरं जावं लागत आहे. मेट्रोच्या कामांमुळे रस्त्याच्या बाजूला डंपर २४ तास सुरु असतात. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या उद्भवतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डंपरमुळे अपघात देखील होतात. त्याचप्रमाणे ऐन झोपण्याच्यावेळी आवाजामुळे वरिष्ठ नागरिक आणि लहान मुलांना त्रास होत आहे, असं आंदोलकांचं म्हणणं आहे. जोपर्यंत डंपर बंद होत नाहीत. तसेच जोपर्यंत लिखित आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील, असा इशारा शिवसेना नेते पांडुरंग संपकाळ यांनी दिला आहे.
या आंदोलनाने हिंसक वळण घेत आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सकाळीच शिवसेनेचे कार्यकर्ते मेट्रो ३ च्या बाहेर आंदोलन करत होते. त्यानंतर तिथे उभे असलेल्या डी.बी. रिअॅलिटी डेव्हलपर्सच्या गाड्या फोडल्या. घटनास्थळ पोलीस दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. आंदोलकांनी हातात फलक घेऊन वाहतूक पोलिसांना वाहतुकीच्या वर्दळीमुळे शाळेत विद्यार्थ्यांना होणारा उशीर तसेच अन्य समस्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.
मुंबई - ट्रॅफिकच्या समस्येला कंटाळून मेट्रो ३ विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून सेना कार्यकर्त्यांकडून गिरगावात गाड्यांची तोडफोड https://t.co/mD82AatBXl
— Lokmat (@MiLOKMAT) November 18, 2019