मागाठाण्यात शिवसेनेचीच बाजी!

By admin | Published: February 25, 2017 03:39 AM2017-02-25T03:39:30+5:302017-02-25T03:39:30+5:30

बोरीवलीच्या पश्चिमेकडे तसेच आसपासच्या बहुसंख्य प्रभागांत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले असले तरी बोरीवलीच्या पूर्वेकडील मागाठाणे विधानसभा मतदारसंघात महापालिकेच्या

Shiv Sena's back! | मागाठाण्यात शिवसेनेचीच बाजी!

मागाठाण्यात शिवसेनेचीच बाजी!

Next

मुंबई : बोरीवलीच्या पश्चिमेकडे तसेच आसपासच्या बहुसंख्य प्रभागांत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले असले तरी बोरीवलीच्या पूर्वेकडील मागाठाणे विधानसभा मतदारसंघात महापालिकेच्या ७ पैकी ६ जागांवर शिवसेनेने बाजी मारली. मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष, मुंबई बँकेचे अध्यक्ष व विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश यांचाही शिवसेनेच्या रिद्धी खुरसुंगे यांनी याच भागातून सहा हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.
मागाठाण्यातील प्रभाग क्रमांक तीनमधून बाळकृष्ण ब्रिद, प्रभाग ४ मधून सुजाता पाटेकर, प्रभाग ५ मधून संजय घाडी, प्रभाग १२ मधून संजय सिंघण आणि प्रभाग २५ मधून माधुरी भोईर हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. याशिवाय रिद्धी खुरसुंगे यांनी भाजपाच्या प्रकाश दरेकर यांना पराभूत केले. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या अंतर्गत येणाऱ्या या प्रभागांत पक्षाला यश मिळाले आहे.
याशिवाय बोरीवली पश्चिमेकडील प्रभाग १८ जबाबदारी आ. सुर्वे यांच्यावर होती. तिथेही शिवसेनेच्या संध्या दोषी यांनी भाजपा उमेदवाराचा दोन हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. तो विधानसभा मतदारसंघ शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा असून, तिथे भाजपाने खूपच जोर लावला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Shiv Sena's back!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.