मुंबई- राज्यातील गद्दारांना परत विधान सभेत पाठवायचे नाही. सध्या गद्दारांच्या गटात दोन गट पडले आहेत. शिंदे गटाला आत्मपरिक्षणाला गरज नाही, असा टोला खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला.
नागपुरात हिवाळी अधिवेशन झाले. या अधिवेशनात शिंदे गट आणि ठाकरे गटांनी आरोप-प्रत्यारोप केले. ठाकरे गटाने कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप करत राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर खोचक टोला गलावला आहे.
शिवसेनेच्या ४ लोकसभा सीटवर भाजपचा दावा, मंत्री कराडही मैदानात उतरणार?
गद्दारांना परत विधानसभेत पाठवायच नाही, ज्या अर्थी दीपक केसरकरांना वाटत परत एकत्र यावे, अस त्यांना वाटत म्हणजे त्यांच्या गटात आणखी गट सुरू झाले आहेत, शिंदे गटाला आत्मपरिक्षणाची गरज नाही. शिंदे गटातील अर्धे आमदार भाजपमध्ये जातील. त्यांना राज्याच नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे, त्यांनी व्यवस्थित काम करावे. भाजपने ही तात्पुर्ती तडजोड केली आहे. यांना भारतीय जनतेच्या पायरीवरही बसवले जात नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला.
बंडखोर आमदारांना आता शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने कायद्याचे भान ठेवून बोलले पाहिजे. हे सरकार आणि शिंदे गटही टीकणार नाही, त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार भाजपमध्ये जातील असा दावाही खासदार संजय राऊत यांनी केला.
'शिवसेना एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही'
ववर्षानिमित्ताने शनि शिंगणापूर, शिर्डी येथे लाखो भाविकांनी दर्शन घेत नववर्षाचा श्रीगणेशा केला. शिंगणापूर येथे शनि देवाच्या शिळेवरती तेलाचा अभिषेक करण्यात आला. तर शिर्डीत साई चरणी लीन होत साई नामाचा गजर केला. नव वर्षानिमित्त साई मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. आज वर्षारंभी साईमूर्तीवर सुवर्णालंकार घालण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री बाराच्या ठोक्याला साई नामाचा व भजनाचा गजर करण्यात आला. राजकीय नेते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही मध्यरात्रीच दर्शन घेतले. यावेळी, पत्रकारांशी बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते आणि मंत्री दिपक केसरकर यांनी शिवसेना एकीचे संकेत दिले आहेत.