शिवसेनेचे आता ‘जय बांगला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:06 AM2021-01-18T04:06:50+5:302021-01-18T04:06:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय रणधुमाळी माजली आहे. ...

Shiv Sena's 'Jai Bangla' now | शिवसेनेचे आता ‘जय बांगला’

शिवसेनेचे आता ‘जय बांगला’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय रणधुमाळी माजली आहे. बंगालच्या या रणधुमाळीत आता शिवसेनाही ‘जय बांगला’ म्हणत शड्डू ठोकणार आहे. शिवसेना पश्चिम बंगालच्या निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी केली.

‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेअंती पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. आम्ही लवकरच कोलकात्यात दाखल होऊ. जय हिंद, जय बांगला’ असे ट्विट करत संजय राऊत यांनी बंगाल निवडणुकांची घोषणा केली. शिवसेना बंगालच्या रणधुमाळीत उतरणार असली, तरी नेमक्या किती ठिकाणी उमेदवार उतरवणार, उद्धव ठाकरे प्रचारासाठी बंगालमध्ये जाणार का, याबाबत कोणताही खुलासा संजय राऊत यांनी केलेला नाही. यापूर्वी शिवसेनेने उत्तर प्रदेशसह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आदी राज्यांत आपले उमेदवार उतरविले होते. अलीकडेच झालेली बिहार विधानसभा निवडणूकही शिवसेनेने लढविली होती. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून वादही झाला होता. नितीशकुमार यांच्या जनता दलाचे निवडणूक चिन्ह बाण आहे. तर, शिवसेनेचे धनुष्यबाण, यामुळे मतदारांमध्ये संभ्रम होत असल्याचा दावा करत जनता दलाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. अखेर धनुष्यबाणऎवजी तुतारी वाजविणाऱ्या मावळ्याचे चिन्ह शिवसेनेला देण्यात आले. शिवसेनेने २२ ठिकाणी आपले उमेदवार उतरविले होते. मात्र, एकाही जागेवर शिवसेनेला डिपाॅझिटही राखता आले नाही.

Web Title: Shiv Sena's 'Jai Bangla' now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.