गुजराती मतांसाठी शिवसेनेचे ‘केम छो’!

By admin | Published: February 18, 2017 06:59 AM2017-02-18T06:59:16+5:302017-02-18T06:59:44+5:30

गेली २५ वर्षे युतीमुळे भाजपासाठी सोडलेल्या जागांवर पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारांची

Shiv Sena's 'Kam Chu' for Gujarati votes! | गुजराती मतांसाठी शिवसेनेचे ‘केम छो’!

गुजराती मतांसाठी शिवसेनेचे ‘केम छो’!

Next

मुंबई : गेली २५ वर्षे युतीमुळे भाजपासाठी सोडलेल्या जागांवर पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारांची जबाबदारी वाढली आहे. शिवसेनेसाठी ही लढाई अस्मितेची असल्याने या उमेदवारांनी सर्व शक्ती पणास लावली आहे. यासाठी आपल्या प्रभागातील गुजराती मतदारांची कुंडलीच हे उमेदवार घेऊन फिरत आहेत. घरोघरी प्रचारासाठी जाताना गुजराती मतदाराला ‘केम छो’ अशी आवर्जून विचारपूस केली जात आहे.
युती असल्यामुळे २२७ पैकी काही जागा आतापर्यंत शिवसेना पक्ष भाजपासाठी सोडत होता. मात्र युती तुटल्यामुळे शिवसेना आता २२७ प्रभागांमध्ये स्वबळावर उतरली आहे. यासाठी गुजराती, मारवाडी समाज मोठ्या संख्येने असलेल्या १२ प्रभागांत गुजराती उमेदवार शिवसेनेने उभे केले आहेत. त्याचबरोबर भाजपातील नाराज कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना फोडून शिवसेनेत आणण्यात आले आहे.
मात्र एवढेच पुरेसे नसल्याने गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन शक्कल लढवण्यात येत आहे. मुंबईत १५ लाख गुजराती मतदार आहेत. हे मतदार भाजपाचे असतील यात काही शंका नाही. मात्र ही मते शिवसेनेच्या पारड्यात पडावी, यासाठी गुज्जू स्टाईलने मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. विशेषत: गुजरातीबहुल भागात नवनवीन फंडे लढवून गुजराती मत वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)
च्मुंबईत १५ लाख गुजराती मतदार आहेत. यापैकी पश्चिम उपनगरात मालाड, कांदिवली, बोरीवली, पूर्व उपनरात मुलुंड, विद्याविहार, घाटकोपर या प्रभागात गुजराती मतदार अधिक आहेत.
च्गुजराती मते निर्णायक ठरणाऱ्या १२ प्रभागांत गुजराती व मारवाडी उमेदवार शिवसेनेने उभे केले आहेत.
च्शिवसेनेने पाटीदार समाजाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल यांस प्रभाग ५५ मध्ये उमेदवार लम्बाचियाच्या प्रचारसभेत उतरवले. गोरेगाव पश्चिमच्या या प्रभागात २२ हजार हजार मतदार आहेत, तर १८ हजार मराठी मतदार आहेत.
च्प्रभाग १३१ मध्ये शिवसेनेतून निवडणूक लढवणारे मंगल भानुशाली हे गुजराती सेलचे प्रमुख होते. या ठिकाणी ५५ टक्के मराठी आणि ३५ टक्के गुजराती मतदार आहेत. भानुशाली यांचा सामना भाजपाचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांच्याशी आहे.
च्पोयसर, चारकोप, कांदिवली येथील दहा हजार गुजराती मते वळवण्यासाठी शिवसेनेने युवा सेनेच्या कार्यकर्त्याची आई जयश्री मिस्त्री यांना उमेदवारी दिली आहे.

Web Title: Shiv Sena's 'Kam Chu' for Gujarati votes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.