पश्चिम उपनगरात इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे जनआंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:10 AM2021-02-06T04:10:30+5:302021-02-06T04:10:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर २०हून अधिक वेळा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोलच्या किमती ९३ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर २०हून अधिक वेळा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोलच्या किमती ९३ रुपयांवर, तर डिझेल दरवाढ ८० रुपयांवर पोहोचले. घरगुती गॅस सिलिंडरचा दरही दिवसेंदिवस वाढत आहे. इंधन दरवाढीचा भडका उडवून केंद्र सरकारने चालवलेल्या सर्वसामान्यांच्या लुटीविरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला.
पश्चिम दुर्तगती महामार्गासमोरील बोरिवली पूर्व येथे ओंकारेश्वर मंदिर ते बोरिवली स्थानकापर्यंत बैलगाडी-सायकल मार्च आणि प्रचंड जनसमुदायासह विभागक्रमांक-१च्या वतीने महामोर्चा काढण्यात आला.
गोरेगावात जनआंदोलन
गोरेगाव रेल्वेस्थानक परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारचा गैरकारभार, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा जनतेवर भार !, रद्द करा, रद्द करा, इंधन दरवाढ रद्द करा...., सारी जनता एक हो, एक होके केंद्र सरकार को फेक दो...केंद्र सरकार मुर्दाबाद.... केंद्र सरकार हाय हाय... अशा जोरदार घोषणांनी गोरेगाव पूर्व रेल्वेस्थानक परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला होता.
उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जनआंदोलन
वांद्रे पूर्व येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेने निदर्शने करत आंदोलन छेडले.
----------------------------------------