आगामी पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा मिनी अजेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:17 AM2021-01-08T04:17:34+5:302021-01-08T04:17:34+5:30

मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी जेमतेम एक वर्ष उरले असल्याने एकीकडे विरोधी पक्ष आक्रमक झाले असून सत्ताधारी शिवसेनेचीही आता धावपळ ...

Shiv Sena's mini agenda for the upcoming municipal elections | आगामी पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा मिनी अजेंडा

आगामी पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा मिनी अजेंडा

Next

मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी जेमतेम एक वर्ष उरले असल्याने एकीकडे विरोधी पक्ष आक्रमक झाले असून सत्ताधारी शिवसेनेचीही आता धावपळ उडाली आहे. निवडणुकीचा अजेंडा मजबूत करण्यासाठी पालक मंत्री आदित्य ठाकरे स्वतः पालिका मुख्यालयात उपस्थिती लावू लागले आहेत. पालिका मुख्यालयात गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिनी अजेंडाच तयार केल्याचे दिसून आले.

मुंबईतील विविध समस्या व विकासकामांचा आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब, आयुक्त इकबाल चहल आदी उपस्थित होते. या बैठकीत मुंबईला पूरमुक्त करण्याच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला. तसेच रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त, कचऱ्यापासून वीजनिर्मिती, ग्रीन एनर्जी आणि सौरऊर्जेवर भर देणे व बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजनांची चर्चा करण्यात आली.

पूरमुक्तीसाठी धावपळ

मुंबई पूरमुक्त करण्याचे महापालिकेचे अनेक प्रयत्न आतापर्यंत फेल गेले आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२० मध्ये मुसळधार पावसात मुंबईची तुंबापुरी झाली होती. यंदाच्या पावसाळ्यातही मुंबई तुंबल्यास २०२२ च्या निवडणुकीत विरोधकांना आयता मुद्दा मिळेल. त्यामुळे पूरमुक्तीसाठी सत्ताधाऱ्यांची धावपळ सुरू आहे. त्यानुसार सखल भागांत साचणारे पाणी टोकियोच्या धर्तीवर रेसकोर्ससारख्या मोकळ्या जागेत भूमिगत मोठ्या टाक्या बांधून त्यात साठविण्यात येणार आहे. त्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर अथवा ते पाणी भरती नसताना समुद्रात सोडण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

अतिक्रमणमुक्त रस्ते, पदपथ

रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त करणे तसेच मुंबईतील उड्डाणपुलाखाली व पदपथाच्या ठिकाणी अंधार असल्यास प्रकाशझोताची व्यवस्था करण्यात येईल. वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत आवश्यक २२ हजार शौचालयांपैकी सात हजार शौचालयांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित शौचालयांचे काम जलदगतीने मार्गी लावण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

ग्रीन, सौर एनर्जीवर भर देणार

कचऱ्यापासून वीजनिर्मिती तसेच ग्रीन एनर्जी, सौरऊर्जेवर भर देऊन विजेचा वापर करण्याबाबतचे धोरण अंमलात आणण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Shiv Sena's mini agenda for the upcoming municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.